For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कॅनडात मिळाली 11 हजार वर्षे जुनी वस्ती

06:45 AM Feb 19, 2025 IST | Tarun Bharat Portal
कॅनडात मिळाली 11 हजार वर्षे जुनी वस्ती
Advertisement

कॅनडाच्या सस्केचेवानमध्ये पुरातत्वतज्ञांना एक प्राचीन वस्ती मिळाली आहे. या वस्तीचे नाव असोवनॉनिक आहे. ही जवळपास 11 हजार वर्षे जुनी आहे. हा शोध उत्तर अमेरिकेच्या प्रारंभिक स्वदेशी संस्कृतींबद्दलचा दृष्टीकोन बदलत आहे. ही वस्ती मध्य कॅनडात पूर्वीच्या विचारापेक्षा खूप आधी संघटित समुदाय असल्याचा पुरावा देते.

Advertisement

असोवानानिकचा क्री भाषेतील अर्थ ‘पार करण्याचे स्थान’ आहे. हे स्टर्जन लेक फर्स्ट नेशनच्या क्षेत्रात आहे. 2023 मध्ये पुरातत्व तज्ञ डेव रोंडो यांना या वस्तीच्या असामान्य खुणा पहिल्यांदा दिसून आल्या होत्या. त्यांनी नदीच्या काठावर याचे अस्तित्व पाहिले होते. तर मागील वर्षी संशोधकांच्या टीमने या ठिकाणी उत्खनन केले. त्यांनी विस्तृत विश्लेषणासाठी नमुने एकत्र पेले, एका चुलीतून मिळालेल्या कोळशाच्या रेडिओकार्बन डेटिंगद्वारे हे जवळपास 10,700 वर्षे जुने असल्याचे कळले. मागील हिमयुगाच्या अंतानंतर आणि पूर्वीच्या धारणेच्या सुमारे 1 हजार वर्षापूर्वी येथे मानवी हालचाली होत्या. हे डेटिंग या ठिकाणाविषयी प्रारंभिक अनुमानांची पुष्टी करते.

असोवानानिकमध्ये दगडी अवजार, अग्निकुंड आणि बायसनची हाडं मिळाली आहेत. हा शोध फर्स्ट नेशनच्या पूर्वजांकडून दीर्घकाळापर्यंतच्या निवासाचा संकेत देतो. येथे एक संघटित वस्ती होती असा निष्कर्ष यातून काढण्यात आला आहे.  लोक या ठिकाणी वारंवार येत राहिले आहेत आणि यातील काही कब्जांदरम्यान शेकडो वर्षांचा कालावधी उलटला आहे. प्राणी नदी कोठे ओलांडणार हे त्यांना माहित होते असा दावा सस्केचेवान विद्यापीठाचे प्राध्यापक ग्लेन स्टुअर्ट यांनी म्हटले आहे.

Advertisement

नदीवर हे स्थान वस्तीसाठी आदर्श स्थान होते. बाइसन यासारख्या प्राण्यांसाठी हे महत्त्वपूर्ण होते. नदीच्या स्थानाने या प्राण्यांना आकर्षित केले असेल, यामुळे हे फर्स्ट नेशनच्या रहिवाशांसाठी एक रणनीतिक स्थळ ठरले असा दावा तज्ञांकडून केला जात आहे. असोवानानिक परिषदेने या स्थळाची सुरक्षा आणि अध्ययनाचे नेतृत्व केले, ज्यात सिनेटर, शिक्षक, युवा आणि शिक्षणतज्ञ सामील आहेत. परिषद या स्थळाची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी संबंधित घटकांसोबत सक्रीय स्वरुपात काम करत आहे.

आमचे पूर्व येथे होते : क्रिस्टीन लॉन्गजॉन

हा शोध एक शक्तिशाली रिमांडर आहे की आमचे पूर्वज येथे होते, निर्माण करत होते, बहरत होते आणि इतिहासाच्या पुस्तकांमध्ये आम्हाला ओळखण्यापूर्वी भूमीला आकार देत होते. दीर्घकाळापर्यंत आमच्या आवाजाला दडपण्यात आले, परंतु हे स्थान आमच्यासाठी बोलत अहे. आमचे मूळ खोल अन् अतूट आहे. यात आमच्या पूर्वजांच्या पाऊलखुणा, त्यांचा संघर्ष, त्यांचा विजय अन् त्यांची बुद्धीमत्ता सामील आहे, प्रत्येक दगड, कलाकृती त्यांच्या शक्तीचा पुरावा आहे, असे उद्गार स्टर्जन लेक फर्स्ट नेशनच्या प्रमुख क्रिस्टीन लॉन्गजॉन यांनी काढले आहेत.

Advertisement
Tags :

.