कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आठ लाखांच्या ११ दुचाकी जप्त

10:43 AM Jun 05, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

कोल्हापूर : 

Advertisement

स्थानिक अन्वे शाखेने दोघा दोघा चोरट्यांकडून 8 लाखांच्या 11 दुचाकी जप्त केल्या आहेत. फिरोज चॉँदसाब यरगट्टी (वय 23 रा.बाबानगर, केनिया पार्क, उचगांव ता.करवीर), इरफान अहमद खान (वय 24 रा. विक्रमनगर, कोल्हापूर) अशी अटक केलेल्या संशयितांची नांवे आहेत.

Advertisement

कोल्हापूर शहर व उपनगरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना कारवाई करण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार एलसीबीच्या पथकाने फिरोज यरगटी आणि इरफान खान या दोघांना अटक करून त्यांच्याकडून 8 लाख रुपये किंमतीच्या 11 दुचाकी जप्त केल्या. या दुचाकी त्यांनी शाहूपुरी व शिरोली एमआयडीच्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरल्या होत्या. शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरलेल्या 4 तर शाहूपुरी हद्दीतील 4, करवीर, वडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतून प्रत्येकी एक, सांगलीतील एक अशा 11 दुचाकी जप्त केल्या आहेत. या कारवाईत एलसीबीचे पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे, संदीप पाटील, सतीश आंबी, सागर चौगले, राजेंद्र वरंडेकर, हंबीरराव अतिग्रेयांनी सहभाग घेतला.

फिरोज आणि इरफान हे दुचाकी चोरून त्या गरजवंताना ते कमी पैशात विकत होते. काही वेळा त्याचे स्पेअर पार्टही काढून विकत असत. मात्र ते पोलीसांच्या जाळ्यात अडकले.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article