बाल्टिक समुद्रात आढळली 11 हजार वर्षे जुनी भिंत
70 फूट खोलीवर होते एक शहर
जर्मनीनजीक बाल्टिक समुद्रात 11 हजार वर्षे जुनी दगडांची भिंत दिसून आली आहे. या ठिकाणी रेनडियरची शिकार केली होती अशा काळातील ही भिंत आहे. ही भिंत प्रागैतिहासिक स्थानिक लोकांकडून तयार करण्यात आली होती. ही भिंत सुमारे 975 मीटर लांब आणि तीन फूट उंच तसेच 6.5 रुंद आहे.
वैज्ञानिकांनी जी भिंत शोधली आहे तिचा केवळ दोन तृतीयांश हिस्साच दिसून येतो. यात सुमारे 1670 दगड मिळाले आहेत. ही भिंत जर्मनीतील किनारी शहर रेरिकपासून 10 किलोमीटर अंतरावर पूर्व दिशेला बाल्टिक समुद्रात 70 फूट खोलवर आहे. बाल्टिक समुद्राच्या या हिस्स्याला मेकलेनबर्गची खाडी म्हटले जाते. युरोपमधील होलोसीन काळात शिकार अडकविण्यासाठी अशाप्रकारच्या लांब अन् रुंद भिंती निर्माण केल्या जात होत्या. अनेकदा शिकाऱ्यांचा समूह स्वत:च्या शिकारीला या भिंतींच्या घेऱ्यात अडकवत होता. मग त्यांची सहजपणे शिकार केली जात होती. मेकलेनबर्गच्या खाडीनजीक मिळालेल्या या भिंतीमुळे येथील लोक रेनडियरची शिकार करत असावेत असा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
समुद्रपातळी वाढल्याने बुडाले शहर
तापमानवाढ आणि बर्फ वितळल्याने समुद्राची पातळी वाढत गेली, जी जमीन पूर्वी समुद्राच्या बाहेर होती ती आता 70 फूट खाली आहे. हा भाग अखेरचे हिमयुग म्हणजेच 8500 वर्षापूर्वी पाण्यात बुडाला होता. तेव्हा डॉगरलँड भाग हा ब्रिटन आणि युरोपीय खंडाशी जोडलेला होता. तीन वर्षांपासून या भिंतीचे अध्ययन केले जात आहे. भिंतीचा भाग समुद्राच्या निळ्या रंगापेक्षा काहीसा वेगळा होता. आम्ही कुठल्याही संरचनेचा शोध घेत नव्हतो, परंतु आम्हाला प्राप्त झालेल्या गोष्टीची कल्पना केली नव्हती असे उद्गार जर्मनीच्या कील विद्यापीठाचे मरीन जियोफिजिसिस्ट जॅकब गीरसेन यांनी काढले आहेत.
अंडरवॉटर ड्रोनचा वापर
वैज्ञानिकांनी ऑटोनॉमस अंडरवॉटर व्हीकलद्वारे या पूर्ण भागाची तपासणी केली. सोनार यंत्रांद्वारे समुद्राच्या आतील हिस्स्याचा नकाशा तयार करण्यात आला. याचबरोबर अनेक पाणबुडे या भिंतीपर्यंत पोहोचले. भिंतीवरील माती आणि दगडांची तपासणी करण्यात आली. मग ही भिंत का आणि कधी बांधण्यात आली याचा खुलासा झाला. गीरसेन आणि मार्सेल ब्रेटमोलर यांचा हा शोध पीएनएएस जर्नलमध्ये अलिकडेच प्रकाशित झाले आहे. ही भिंत प्रत्यक्षात गुरांना समुद्राच्या दिशेने जाण्यापासून रोखण्याकरता निर्माण करण्यात आली होते