ऑक्टोबरमध्ये विमान प्रवाशांच्या संख्येत 11 टक्के वाढ
मुंबई :
देशांतर्गत विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येमध्ये गेल्या ऑक्टोबर महिन्यामध्ये 11 टक्के वाढ झाली आहे. गेल्या महिन्यात 1.26 कोटी प्रवाशांनी विमानप्रवास केला. ऑक्टोबर 2022 मध्ये 1.14 कोटी प्रवाशांनी विमानाने प्रवास करणे पसंत केले होते.
यंदा ऑक्टोबर आधीच्या म्हणजेच सप्टेंबर 2023 मध्ये 1.22 कोटी प्रवाशांनी विमानप्रवास केला. ऑक्टोबरमध्ये मात्र विमान प्रवाशांच्या संख्ये लक्षणीय वाढ नोंदवली गेली असून या प्रवासामध्ये इंडिगो कंपनीने सर्वाधिक प्रवाशांना प्रवास घडवून आणल्याचे दिसून आले. यानंतर टाटा समुहाची एअर इंडियाही दुसऱ्या नंबरवर राहिली होती. 79.07 लाख प्रवाशांनी इंडिगो विमानाने ऑक्टोबरमध्ये प्रवास केला होता.
इंडिगो राहिली आघाडीवर
देशांतर्गत विमानप्रवासाच्या टक्केवारीत इंडिगोचा वाटा 62 टक्के इतका सर्वाधिक दिसून आला. याच्या मागच्या महिन्यात म्हणजेच सप्टेंबरमध्ये 63 टक्के वाटा इंडिगोने उचलला होता. देशातंर्गत विमानप्रवासात एअर इंडियाचे प्रमाण 10 टक्के होते. सप्टेंबरमध्ये ते 9.8 टक्के इतके होते. म्हणजेच ऑक्टोबरमध्ये प्रमाणात सुधारणा झाली आहे.