महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

एलपीजी टँकर स्फोटात 11 जण जिवंत जळाले

06:44 AM Dec 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

जयपूरमधील दुर्घटना : परिसरातील अनेक वाहने आगीच्या विळख्यात

Advertisement

वृत्तसंस्था/ जयपूर

Advertisement

जयपूरमधील अजमेर महामार्गावरील दिल्ली पब्लिक स्कूलसमोर शुक्रवारी सकाळी एलपीजी गॅसने भरलेल्या टँकरमध्ये स्फोट झाला. या दुर्घटनेत 11 जण जिवंत जळाले असून तर 33 जण गंभीर जखमी झाले आहेत. गॅस टँकरला ट्रकने धडक दिल्यामुळे टँकरमधून गॅसची गळती झाल्याने आगीचा भडका उडाला. या भडक्याची झळ घटनास्थळापासून एक किलोमीटरपर्यंत बसल्याने अनेक वाहने आणि लोक आगीच्या विळख्यात अडकले.

जयपूर ते अजमेर महामार्गावर सकाळच्या सुमारास सकाळची थंडी असतानाही अचानक आजूबाजूचा परिसर आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. कोणाला काही समजण्यापूर्वीच या आगीने अनेक वाहने आणि रस्त्याच्या बाजूला असलेला एक कारखाना आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. या घटनेमुळे काही वेळातच सगळीकडे आरडाओरडा आणि धावपळ सुरू झाली. लोकांना काय झाले हे समजेपर्यंत संपूर्ण परिसर आगीच्या लोटामध्ये बदलला होता. टँकरजवळच्या कारमध्ये बसलेले लोक काही सेकंदातच जळून खाक झाले. हळूहळू महामार्गावरून जाणारी अन्य वाहनेही आगीच्या टप्प्यात आली. यादरम्यान आग कशी लागली या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्याआधीच सर्वजण स्वत:चे प्राण वाचवण्यासाठी धडपडू लागले.

या घटनेची माहिती पोलीस प्रशासनाला मिळाल्यानंतर तातडीने बचावकार्य सुरू झाले. या भीषण अपघातात सायंकाळपर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला होता. मात्र, एकंदर परिस्थिती पाहता मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, आगीत जळालेल्या 32 जणांना सवाई मानसिंग रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याचदरम्यान रुग्णालयात उपचारादरम्यान 5 जणांचा मृत्यू झाला. 32 पैकी 15 रुग्ण 50 टक्क्यांहून अधिक भाजलेले आहेत. जयपूरिया रुग्णालयात एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

अपघात कसा घडला?

जयपूर-अजमेर महामार्गावरील दिल्ली पब्लिक स्कूलसमोर एलपीजीने भरलेला एक टँकर अजमेरहून जयपूरच्या दिशेने येत होता. यादरम्यान टँकर यू टर्न घेत असताना काही वाहनांनी ब्रेक लावत आपली वाहने थांबवली. टँकर कधी वळतो याची सर्वजण वाट पाहत होते. इतक्यातच जयपूरहून आलेला भरधाव ट्रक टँकरला धडकला. ट्रकची धडक इतकी भीषण होती की टँकरमधून गॅस गळती झाली. द्रवरूपात गळती झाल्यानंतर गॅसने पेट घेतला. तसेच गॅसही आजूबाजूला पसरल्याने आगही तितक्याच वेगाने लागल्याने आजूबाजूचा संपूर्ण परिसर व्यापला.

40 हून अधिक वाहनांना आग

दोन वाहनांच्या धडकेनंतर काही सेकंदात एकामागून एक आलेली 40 वाहने आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. सुरुवातीला ही आग 200 मीटर परिसरात पसरली पण नंतर ती सुमारे 1 किलोमीटर परिसरात पसरली. वाहनांमध्ये बसलेले लोक वाहनांचे दरवाजे उघडून पळू लागले. रस्त्याच्या कडेला असलेल्या पाईप फॅक्टरीलाही आग लागली. अपघातात उदयपूरच्या लेकसिटी ट्रॅव्हल्सच्या बसलाही धडक बसली. बसमध्ये 34 प्रवासी होते, त्यापैकी 21 जणांचा आतापर्यंत शोध लागला असून 13 जणांची माहिती मिळालेली नाही. ही बस उदयपूरहून रात्री 9 वाजता निघाली होती.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article