चापगाव येथे वीज कोसळून 11 बकरी ठार : दोन लाखाचे नुकसान
12:15 PM May 13, 2025 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
खानापूर प्रतिनिधी
Advertisement
खानापूर तालुक्यात सोमवारी सायंकाळी ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटात जोरदार वळिवाचा पाऊस झाला. यावेळी चापगाव परिसरात आपली बकरी घेऊन राहिलेल्या उमेश चचडी रा. हुन्नूर ता. बैलहोंगल येथील धनगराची अकरा बकरी वीज कोसळल्याने जागीच ठार झाली. त्यामुळे या धनगराचे जवळपास दोन लाखांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
Advertisement
याबाबतची माहिती नंदगड पोलिसांना देण्यात आली. नंदगड पोलीस स्थानकाचे पोलीस हवालदार श्रीनिवास तुरमुंडी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. याच ठिकाणी मारुती चोपडे यांच्या घरावरही वीज पडल्याने त्यांच्या घरातील विजेची उपकरणे जळून खाक झाली आहेत. त्यामुळे त्यांचेही मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
Advertisement
Next Article