For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दहावी परीक्षा-3 उद्यापासून

06:36 AM Aug 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
दहावी परीक्षा 3 उद्यापासून
Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

Advertisement

राज्यात दहावी परीक्षा-3 ऑगस्ट 2 पासून सुरू होणार आहे. या परीक्षेसाठी राज्यभरातून सुमारे 97,993 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे, अशी माहिती शालेय परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाने दिली आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून दहावीसाठी तीन वार्षिक परीक्षा घेण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये आणि निकालावर असमाधानी असलेल्या विद्यार्थ्यांना गुणवृद्धीची संधी देण्यासाठी वर्षातून तीन परीक्षा घेतल्या जात आहे. दोन परीक्षा यापूर्वीच झाल्या असून 2 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट या कालावधीत दहावी परीक्षा-3 घेतली जाणार आहे. राज्यातील 35 शैक्षणिक जिल्ह्यांतील 410 केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.