100 व्या चित्रपटाची घोषणा
रजनीकांत यांचा अलिकडेच प्रदर्शित चित्रपट ‘कुली’मध्ये सुपरस्टार नागार्जुन दिसून आले. या चित्रपटातील नकारात्मक छटेच्या त्यांच्या भूमिकेचे कौतुक झाले. आता नागार्जुन यांनी स्वत:च्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. हा त्यांचा 100 वा चित्रपट असणार आहे. नागार्जुन यांच्या 100 व्या चित्रपटाचे दिग्दर्शन कार्तिक यांच्याकडून केले जाणार आहे. याचे नाव सध्या ‘किंग 100’ ठेवण्यात आले आहे. या चित्रपटाची तयारी मागील 6-7 महिन्यांपासून सुरू आहे. तमिळ दिग्दर्शक कार्तिकने एक वर्षापूर्वी याची कहाणी ऐकविली होती. हा एक आकर्षक चित्रपट असून तो अॅक्शनदृश्यांनी नटलेला असेल असे नागार्जुन यांनी सांगितले आहे. स्वत:च्या 100 व्या चित्रपटात नागार्जुन हे मुख्य नायकाच्या भूमिकेत असतील. नागार्जुन हे यापूर्वी कुली चित्रपटात रजनीकांत, सौबेन शाहिर, उपेंद्र कुमार, आमिर खान आणि श्रुती हासनसोबत दिसून आले होते. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर संमिश्र यश मिळाले आहे.