महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

रताळी 100 तर कांदा दरात क्विंटलला 200 रुपयांची घसरण : बटाटा दर स्थिर

06:07 AM Jan 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

भाजीपाल्याचे भावदेखील स्थिर राहिल्याने सर्वसामान्यांतून समाधान 

Advertisement

सुधीर गडकरी/ अगसगे

Advertisement

बेळगाव कृषी उत्पन्न बाजारपेठेमध्ये शनिवारच्या बाजारात कांदा भाव प्रति क्विंटल 200 रुपयांनी कमी झाला तर आग्रा बटाटा, इंदोर, बटाटा, तळेगाव बटाटा यांचा भाव प्रतिक्विंटल स्थिर आहे. तर रताळी आवकेत वाढ झाल्याने रताळी भाव क्विंटलला 100 रुपयांनी कमी झाला आहे. भाजीमार्केटमध्ये भाजीपाला आवकेत स्थिरता असल्याने भाजीपाल्याचे भावदेखील स्थिर आहेत. कोबी आणि गोल भोपळा यांच्या दरात वाढ झाली आहे. सध्या कांदा, बटाटासह भाजीपाल्यांच्या दरात स्थिरता असल्याने सर्वसामान्यांतून समाधान व्यक्त होत आहे.

मागील शनिवार दि. 13 रोजी झालेल्या बाजारात कांद्याचा भाव क्विंटलला 1000 ते 2000 रुपये झाला होता. इंदोर बटाटा नवीन 1000 ते 1800 तर इंदोर जुना बटाटा भाव 1500 ते 2400 रुपये तर आग्रा बटाटा भाव 1200 ते 1700 रुपये आणि तळेगाव बटाटा भाव 1000 ते 2000 रुपये होता आणि रताळी भाव 300 ते 1200 रुपये झाला होता.

तर बुधवार दि. 17 रोजी झालेल्या बाजारात भोगी आणि मकर संक्रांती असल्यामुळे कांदा आवकेत घट निर्माण झाली होती. मार्केट यार्डमध्ये कांदा आवकेत घट निर्माण झाल्याने कांदा भाव प्रति क्विंटल 200 रुपयांनी वाढला होता. इंदोर बटाटा 1000 ते 1800 रुपये झाला होता. तळेगाव बटाटा 1200 ते 1800 रु., आग्रा बटाटा 1300 ते 1800 रु., रताळी 250 ते 1200 रुपये झाली होती.

शनिवार दि. 20 रोजी झालेल्या बाजारात कांदा भाव 800 ते 2000 रुपये तर काही ठिकाणी चुकून 2100 रुपये झाला. इंदोर बटाटा नवीन 1000 ते 1900 रुपये, इंदोर बटाटा जुना 1500 ते 2500 रु., आग्रा बटाटा 1200 ते 1700 रु., तळेगाव बटाटा 1200 ते 1900 रु. झाला आहे, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

कांदा आवकेत वाढ

मार्केट यार्डच्या बुधवार दि. 17 रोजी झालेल्या बाजारात कांदा आवकेत घट निर्माण झाली होती. कारण, रविवारी भोगी आणि सोमवारी मकर संक्रांती सण असल्यामुळे महाराष्ट्रातून कांदा आवक कमी झाली होती. सध्या महाराष्ट्रातून कांदा आवक सुरू होऊन एक महिन्याहून अधिक काळ झाला आहे. तरीसुद्धा कांदा काही प्रमाणात कच्चा येत आहे. पाकड कांदा आवक मार्चनंतर वाळलेला कांदा बाजारात येतो. बुधवारी कांदा भाव 1000 ते 2200 रु. झाला होता. मात्र शनिवारी कांदा आवक वाढल्याने दरात क्विंटलला 200 रुपयांनी कमी झाला आहे. 1000 ते 2000 रुपये भाव झाला, अशी माहिती अडत व्यापाऱ्याने दिली.

इंदोर बटाटा भाव स्थिर

इंदोरमध्ये नवीन इंदोर बटाटा उत्पादन काढणीला मोठ्याने सुरुवात झाली आहे. या ठिकाणी व्यापारी शेतकऱ्यांच्या शेतामध्येच जावून बटाट्याच्या राशीच खरेदी करतात. आणि देशातील विविध बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी पाठवतात. मार्चनंतर बटाटा शितगृहामध्ये साठवून ठेवण्यात येतो. सध्या काही प्रमाणात बटाटा पाकड येत आहे. केवळ 30 टक्के बटाटा कचवड येत आहे. बेळगावसह गोवा, कारवार, कोकणपट्टा, खानापूर, हल्याळ, बैलहोंगल, रामदुर्ग आदी ठिकाणी इंदोर बटाटा बेळगाव मार्केट यार्डमधून जातो, अशी माहिती बटाटा व्यापाऱ्यांनी दिली.

भाजीपाला भाव स्थिर

सध्या बेळगाव, खानापूर, घटप्रभा आदी परिसरातील भाजीपाला भाजीमार्केटमध्ये विक्रीसाठी येत आहे. बेंगळूरहून बिन्स, गाजर तर हिरवा वाटाणा मध्यप्रदेशहून मुंबईहून बटका जी फोर ढबू मिरची आवक येत आहे. आणि भाजीपाला भाव स्थिर आहेत. केवळ गोल भोपळा व कोबी यांच्या दरात वाढ झाली आहे, अशी माहिती भाजी व्यापाऱ्यांनी दिली.

रताळी 100 रुपयांनी कमी झाली

मार्केट यार्डमध्ये शनिवारी सुमारे 90 ट्रक रताळी आवक विक्रीसाठी आली होती. ही रताळी बेळगाव, खानापूर, चंदगड तालुक्यातून येत आहेत. रताळी आवक वाढल्याने भाव 100 रुपयांनी कमी झाला. सध्या ही रताळी दिल्ली, हरियाणा, पंजाब, गुजरात, उत्तर प्रदेश, मुंबई, फरीदाबाद आदी ठिकाणी जात आहेत, अशी माहिती रताळी व्यापाऱ्यांनी दिली.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#business#social media
Next Article