महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

पापुआ न्यू गिनीमध्ये 100 जणांच्या मृत्यूची भीती

06:45 AM Jul 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

भूस्खलनामुळे लोक ढिगाऱ्याखाली गाडले : मदत-बचावकार्य सुरू

Advertisement

वृत्तसंस्था/ पोर्ट मोरेस्बी

Advertisement

ऑस्ट्रेलियातील पापुआ न्यू गिनीच्या काओकलाम गावात भूस्खलनात 100 हून अधिक लोकांचा मृत्यू होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पापुआ न्यू गिनीची राजधानी पोर्ट मोरेस्बीच्या वायव्येस 600 किलोमीटर अंतरावर असलेल्या एन्गा प्रांतातील काओकलाम गावात स्थानिक वेळेनुसार पहाटे 3 वाजता भूस्खलन झाले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर प्रशासकीय पथक घटनास्थळी पोहोचले असून मदत व बचावकार्य सुरू आहे.

ऑस्ट्रेलियन ब्रॉडकास्टिंग कॉर्पकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा 100 पेक्षा जास्त असू शकतो असे तेथील रहिवाशांचे म्हणणे आहे. मात्र, अधिकाऱ्यांनी अद्याप या आकडेवारीला दुजोरा दिलेला नाही. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत असून त्यामध्ये स्थानिक लोक मातीचा भराव उकरून मृतदेह बाहेर काढत असल्याचे दिसत आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article