For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तेलंगणातील अधिकाऱ्याकडे सापडले 100 कोटींचे घबाड

07:00 AM Jan 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
तेलंगणातील अधिकाऱ्याकडे सापडले 100 कोटींचे घबाड
Advertisement

एसीबीच्या छाप्यात 40 लाख रोख, 2 किलो सोने, महागडी घड्याळे जप्त

Advertisement

वृत्तसंस्था /हैदराबाद

तेलंगणा सरकारमधील अधिकारी शिवा बालकृष्ण यांच्या मालमत्तांवर टाकण्यात आलेल्या छाप्यात 100 कोटी ऊपयांहून अधिक संपत्ती जप्त करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 40 लाख ऊपये रोख, 2 किलो सोने, 60 महागडी घड्याळे, 14 स्मार्ट फोन, 10 लॅपटॉप, स्थावर मालमत्तेशी संबंधित अनेक कागदपत्रे आणि नोट मोजण्याचे यंत्र जप्त करण्यात आले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या 14 पथकांनी राज्यभरात बालकृष्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या 20 ठिकाणांवर छापे टाकले होते. बालकृष्ण हे तेलंगणा रिअल इस्टेट नियामक प्राधिकरणचे सचिव आहेत. तसेच ते हैदराबाद महानगर विकास प्राधिकरणाचे संचालकही राहिले आहेत. छाप्यांच्या कारवाईदरम्यान बालकृष्ण यांना अटक करण्यात आली आहे. पदाचा गैरवापर करून बेहिशेबी मालमत्ता जमवल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. हैदराबाद मेट्रोपॉलिटन डेव्हलपमेंट अॅथॉरिटीचे संचालकपद भूषवताना बालकृष्ण यांनी मोठी संपत्ती मिळवल्याचा एसीबीचा आरोप आहे. अनेक रिअल इस्टेट कंपन्यांना परवाने देण्याची सोय करून त्यांनी कोट्यावधी ऊपये कमावले आहेत. तसेच त्यांच्या नावावर 4 बँकांमध्ये लॉकर्स सापडले असून ते उघडण्यात येणार आहेत. बालकृष्ण यांच्या घराची झडती संपली असली तरी अजूनही चार ठिकाणी तपास सुरू आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.