100 बाहुल्यांना सांभाळणारी महिला
एका दुर्घटनेतून सुरू झाली होती कहाणी
लोक स्वकीयाच्या मृत्यूनंतर त्याच्या आठवणीत अनेक गोष्टी करत असतात. एका महिलेला मुलासारख्या मित्राच्या आठवणींमुळे एक अनोखा छंद जडला आहे. आता या महिलेकडे 1000 चिनी मातीच्या बाहुल्यांचा संग्रह आहे. या महिलेचा बहुतांश वेळ या बाहुल्यांचा सांभाळ करण्यातच खर्ची पडतो. बाहुल्यांचा हा संग्रह माझे मन दुखावले गेल्याने निर्माण झाल्याचे तिचे सांगणे आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या वेरिनिगिंगच्या लिन एम्डिन स्वत:च्या प्रिय आकृतींना स्वत:च्या बागेमधील एका मोठ्या शेडमध्ये ठेवतात, या बाहुल्यांना सेकंड-हँड विक्रीशी संबंधित वेबसाइटवरून खरेदी करण्यात आले होते. चार अपत्यांची आई असलेल्या लिन या बाहुल्यांना पूर्ण प्रेम देणे, त्यांना कस्टम-मेड कपडे परिधान करणे आणि त्यांच्यावर परफ्यूमचा मारा करण्यास कित्येक तास घालवत असतात.
लिन स्वत:च्या परिवाराच्या ऑटो पार्ट्स आणि सहाय्यक उपकरण व्यवसायासाठी देखील काम करतात. त्यांचा हा छंद आणि त्यांची ‘शी शेड’ एक सुरक्षित ठिकाण झाले आहे. लिन यांचा हा छंद पहिल्यांदा 20 वर्षांपूर्वी सुरू झाला होता. तेव्हा कौटुंबिक मित्र माइकल टोल्मेने त्यांना वाढदिवसानिमित्त रोज नावाची एक चिनी मातीची बाहुली दिली होती. दोन महिन्यांनी वयाच्या केवळ 21 व्या वर्षी एका दुचाकी अपघातात मायकलचा दुर्देवी मृत्यू झाला होता.
मायकल माझ्या मुलांचा सर्वात चांगला मित्र होता आणि मला पुत्रासारखा होता. जेव्हा मी या बाहुल्यांकडे पाहते, तेव्हा मला मायकलची आठवण येते. याचमुळे चिनी मातीच्या बाहुल्यांबद्दलचे माझे प्रेम वाढले आहे. शक्य होईल तितक्या प्रमाणात मी चिनी मातीच्या बाहुल्यांचा संग्रह जमवत असल्याचे लिन सांगतात.
लिन या चार मुलांच्या आई आहेत. मला मुलगी नसल्याने कधीकधी हा संग्रह मी का सुरु केला असा प्रश्न मनात येतो. तर माझे मुलगे हा संग्रह पाहून चिडतात. परंतु माझे 65 वर्षीय पती रिक यांचे पूर्ण समर्थन असल्याचे लिन यांनी सांगितले. या संग्रहासाठी किती रक्कम खर्च केली हे दांपत्याला नेमके माहित नाही. पुनर्स्थापित चिनी मातीच्या बाहुल्या फारशा महाग नसतात असे त्यांचे सांगणे आहे.