महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

गणरायाच्या स्वागतासाठी 10 टन फुलांची आवक

06:11 AM Sep 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

फूल बाजारात वर्दळ : रंगीबेरंगी फुलांची विक्री

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisement

गणरायाच्या स्वागतासाठी शनिवारी अशोकनगर येथील होलसेल फूल बाजारात तब्बल 10 टन फुलांची आवक झाली होती. विशेषत: रंगीबेरंगी आकर्षक फुले  दाखल झाली होती. त्यामुळे फूल बाजारही विविध प्रकारच्या फुलांनी बहरला होता.

गणरायाचे उत्साहात स्वागत करण्यासाठी भक्तांचा उत्साह ओसंडून वाहू लागला आहे. या पार्श्वभूमीवर फुलांना मागणी वाढू लागली आहे. फूल बाजारात झेंडू, गुलाब, शेवंती, मोगरा, जुई, अबोली यासह इतर फुलांनाही मागणी वाढली होती. विशेषत: गणरायाच्या सजावटीसाठी झेंडूच्या फुलांना अधिक पसंती दिली गेली. दैनंदिन 5 ते 6 टन आवक होते. मात्र, शनिवारी फूल बाजारात 10 टन फुले दाखल झाली होती. त्याबरोबरच हरितालिका, गणेश चतुर्थी, ऋषी पंचमी आणि सत्यनारायण पूजा व इतर धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. त्यामुळे गणेशोत्सव काळात फुलांची रेलचेल पाहावयास मिळत आहे.

महांतेश मुरगोड (बागायत खाते, सहसंचालक)

सणासुदीच्या काळात फुलांची मागणी अधिक असते. शनिवारी गणेशोत्सवासाठी 10 टन फुलांची आवक झाली. यामध्ये झेंडूच्या फुलांना अधिक मागणी होती. यंदाच्या अतिवृष्टीमुळे फूल शेतीलाही फटका बसला आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article