कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

जिल्ह्यात १७०१ श्री सदस्यांकडून १० टन ७२१ किलो निर्माल्य संकलन

02:47 PM Sep 08, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

कास :

Advertisement

समाजप्रबोधनासह समाजहितोपयोगी उपक्रम राबविणाऱ्या रेवदंडा (ता. अलिबाग जि. रायगड) येथील डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानमार्फत पद्मश्री महाराष्ट्रभूषण स्वच्छतादूत डॉ. श्री आप्पासाहेब तथा दत्तात्रेय नारायण धर्माधिकारी, रायगडभुषण डॉ. सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी गणेशोत्सव काळातील निर्माल्य संकलन व कंपोस्ट खतनिर्मितीचा पर्यावरणपुरक उपक्रम जिल्हयात एकुण दहा ठिकाणी संपन्न झाला.

Advertisement

संगम माहुली, बुधवार नाका कृत्रिम तळे, सातारा, महागणपती घाट (वाई), कृष्णा घाट (भुईंज), प्रितीसंगम घाट (कराड), पाचवड फाटा (धोंडेवाडी), येरळा नदी (वडुज), येरळा नदी (पुसेगाव), कोयना नदी मुळगाव पुल (पाटण), निसरे पूल मारूलहवेली या दहा ठिकाणी राबविलेल्या पर्यावरणपुरक उपक्रमात १७०१ सदस्यांनी १०७२१.४१ किलोग्रॅम निर्माल्य संकलन करून रविवारी प्रतिष्ठानमार्फत वृक्षारोपण ठिकाणी खतनिर्मितीच्या प्रक्रियेस सुरुवात केली

सातारा येथे पालकमंत्री शंभुराजे देसाई, सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्याधिकारी अभिजीत बापट, वाई येथे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, प्रांत डॉ. योगेश खरमाटे, तहसिलदार सोनाली मेटकरी, मुख्याधिकारी संजीवनी दळवी, महागणपती संस्थान अध्यक्ष शैलेश गोखले, पुसेगाव येथे कृष्णा खोरे विकास महामंडळ उपाध्यक्ष आ. महेश शिंदे, प.पू. मठाधिपती श्री महंत सुंदरगिरी महाराज, कराड येथे माजी सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील, प्रांत अतुल म्हेत्रे, सोपान टोम्पे, तहसिलदार कल्पना ढवळे, नायब तहसिलदार बाबुराव राठोड, डीवायएसपी राजश्री पाटील, मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर, वडूज येथे न्यायाधीश विद्याधर काकतकर, पंचायतराज ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या पत्नी सौ. सोनिया गोरे, पाचवड फाटा (धोंडेवाडी) येथे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, पीआय महेंद्र जगताप, जिल्हा काँग्रेस सरचिटणीस पै. नानासाहेब पाटील, पाटण येथे प्रांताधिकारी सोपान टोम्पे, तहसिलदार अनंत गुरव, मुख्याधिकारी संतोष मोरे, पोलीस उपअधीक्षक विजयसिंह पाटील, मारूल हवेली येथे प्रांत सोपान टोम्पे, एपीआय चेतन मछले, पीएसआय बाजीराव घाडगे, भुईंज येथे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रज्ञा माने भोसले, पाटबंधारेचे उपविभागीय अधिकारी श्रीकांत महामुनी, एपीएसआय रमेश गर्जे, पीएसआय पतंगराव  पाटील, सर्व पोलीस कर्मचारी, आजी माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य, बँक संस्था पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.

पर्यावरणपुरक जनजागृतीचा मोलाचा संदेश मिळून उपक्रमाचे सर्वस्तरातुन मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे. जलप्रदुषण थांबण्यासाठी, पर्यावरण संतुलनासाठी निर्माल्य संकलन व खतनिर्मिती उपक्रमातुन जनजागृती झाली.

संकलित निर्माल्यातील प्लास्टिक पिशव्या तसेच विघटन न होणाऱ्या वस्तु, पदार्थ निवडून त्यांची योग्यप्रकारे विल्हेवाट लावण्यात आली. ६७६.६७प्लास्टीक वेगळे करण्यात आले. तसेच शेकडो किलो प्लास्टिक कराड नगरपरिषदेच्या प्लास्टीक संकलन केंद्रात पाठवण्यात आले

प्रतिष्ठानमार्फत जिल्ह्यात पंधरा-वीस ठिकाणी आत्तापर्यंत वृक्षारोपन केले आहे. हजारो झाडे जगविण्यात आली असुन संकलित निर्माल्यापासुन तयार कंपोस्ट खत वृक्षांना घालण्यात आले आहे.

निर्माल्य संकलन व खतनिर्मिती उपक्रमात गणेशभक्तांकडून निर्माल्य संकलन केल्यामुळे नदी, तलाव, बंधारा, घाट येथील होणारे जलप्रदुषण थांबविण्यासाठी प्रशासनावरील बराचसा ताण कमी होण्यास मदत झाली. नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत होता.

गणेशोत्सव कालावधीत संकलित निर्माल्य प्रतिष्ठानमार्फत वृक्षारोपण केलेल्या ५ ठिकाणी ठराविक मापाचा खोल खड्डा खोदुन त्यात एक थर मातीचा तदनंतर निर्माल्याचा तदनंतर शेणाचा तंदनंतर निर्माल्य, शेणखत, मातीचा थर अशाप्रकारे निर्माल्यानुसार थर देवून खतनिर्मितीच्या प्रक्रियेस सुरुवात केली. खड्याच्या चोहोबाजुला आळे करून पाणी सोडून काही महिन्यानी तयार झालेले सेंद्रीय खत वृक्षारोपण केलेल्या वृक्षांना घालण्यात येणार आहे.

संपुर्ण महाराष्ट्रात प्रतिष्ठानचे कार्य जवळून पाहत आहे. आपण सर्वजण खूप चांगले काम करत असून प्रतिष्ठानच्या कार्याला खूप शुभेच्छा आहेत.

                                                                                           -शंभूराजे देसाई, पालकमंत्री तथा पर्यटन विकास मंत्री

प्रतिष्ठानचे कार्य गौरवास्पद असून प्रतिष्ठानच्या निस्वार्थ सामाजिक कार्याला शुभेच्छा आहेत.

                                                                                          -शिवेंद्रसिंहराजे भोसले, सार्वजनिक बांधकाममंत्री

संपूर्ण देशभरात सुरू असलेल्या समाजसेवेत सर्वजण उत्साहाने सहभागी होऊन समाजाला दिशा देण्याचे कार्य घडत आहे. प्रत्येकाच्या घरी सण असतानाही सामाजिक बांधिलकीतून निरपेक्षपणे राबविलेल्या प्रतिष्ठानच्या कार्याला शुभेच्छा.

                                                                                                          -मकरंद पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article