For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

छत्तीसगडमध्ये 10 नक्षलवाद्यांना कंठस्नान

07:00 AM Sep 12, 2025 IST | Tarun Bharat Portal
छत्तीसगडमध्ये 10 नक्षलवाद्यांना कंठस्नान
Advertisement

1 कोटीचे इनाम असलेला बालकृष्णही मारला गेला

Advertisement

वृत्तसंस्था/रायपूर

छत्तीसगडच्या गरियाबंदमध्ये सुरक्षा दलांनी एका मोहिमेत 1 कोटीचे इनाम असलेला मनोज उर्फ मोडेम बालकृष्ण समवेत 10 नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले आहे. मोडेमचा मृत्यू सुरक्षा दलांसाठी मोठे यश मानले जात आहे. गुप्तचर माहितीच्या आधारावर गरियाबंद येथे नक्षलवादी म्होरक्या बालकृष्णचा वावर असल्याची पुष्टी झाल्यावर बुधवारी मोहीम हाती घेण्यात आली होती. गुप्तचरांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर मोहीम राबविली असता मोडेम बालकृष्ण समवेत 10 नक्षलवादी मारले गेले आहेत. मोडेम बालकृष्ण विरोधात 1 कोटी रुपयांचे इनाम घोषित होते. चकमक गरियाबंदच्या एका दुर्गम क्षेत्रात झाली असून तेथे सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांच्या एका समुहाला घेरले होते.

Advertisement

गरियाबंद जिल्ह्यातील ई30, एसटीएफ आणि कोब्रा बटालियनच्या जवानांनी नक्षलवाद्यांसोबतच्या चकमकीत नेतृत्व केले. गरियाबंदचे पोलीस अधीक्षक निखिल राखेचा हे सातत्याने जवानांच्या संपर्कात होते. संबंधित ठिकाणी भीषण चकमक अद्याप सुरू असल्याचे समजते. यामुळे गरियाबंद येथून बॅकअप टीम रवाना करण्यात आली आहे. या मोहिमेत राज्य पोलीस, सीआरपीएफ, कोब्रा बटालियन्सच्या टीम्सनी भाग घेतला होता. चकमकीत मारला गेलेला मोडेम बालकृष्ण हा ओडिशा स्टेट कमिटीचा (ओएससी) वरिष्ठ सदस्य होता असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

नक्षलवाद्यांचा गड

गरियाबंद जिल्हा दीर्घकाळापासून नक्षली कारवायांचा गड राहिला आहे. तेथे सुरक्षादल आणि नक्षलवाद्यांदरम्यान अनेक चकमकी झाल्या आहेत. अलिकडच्या काळात सुरक्षा दलांनी येथील नक्षलवाद्यांचा प्रभाव कमी करण्यासाठी अनेक यशस्वी मोहीम राबविल्या आहेत. या मोहिमांध्ये अनेक नक्षली म्होरके मारले गेले आहेत किंवा त्यांना अटक करण्यात आली आहे.

कोण होता मोडेम बालकृष्ण?

मनोज उर्फ मोडेम बालकृष्ण हा नक्षली संघटनेतील वरिष्ठ नेता होता, त्याच्या विरोधात अनेक गंभीर गुन्हे नोंद होते, यात हत्या, लूट आणि पोलिसांवर हल्ल्याचा आरोप सामील आहे. त्याच्या विरोधात 1 कोटी रुपयांचे घोषित इनामच तो नक्षलवादी कारवायांमध्ये किती प्रभावशाली होता हे कळते. मोडेम बालकृष्णच्या मृत्यूमुळे नक्षलवादी संघटनेचे कंबरडे मोडण्यास मदत मिळणार आहे. बालकृष्ण हा स्वत:सोबत एके47 घेऊन फिरत होता. यापूर्वी गरियाबंद जिल्ह्यातच टॉप नक्षलवादी चलपती मारला गेला होता, त्याच्यावरही एक कोटीचे इनाम होते.

Advertisement
Tags :

.