महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कुंडई व मडकई औद्योगिक वसाहतीसाठी 10 एमएलडी पाणी प्रकल्प

12:54 PM Dec 04, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मंत्री सुदिन ढवळीकर यांच्याहस्ते कामाचा शुभारंभ

Advertisement

वार्ताहर /मडकई

Advertisement

कुंडई व मडकई औद्योगिक वसाहत व आसपासच्या भागांसाठी 2 कोटी 75 लाख खर्चुन 10 एमएलडी पाण्याच्या प्रकल्प उभारण्यात येणार आहे. त्यासाठी नवदुर्गा देवीच्या जत्रोत्सवाचे औचित्य साधून या प्रकल्पाच्या बांधकामाचा शुभारंभ करण्यात आलेला आहे. वर्षभरात हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पाण्याची समस्या निकालात काढून येथील भागातील नागरिकांना व औद्योगिक वसाहतीमध्ये मुबलक प्रमाणात पाणी मिळवून देण्यासाठी आपण कटीबद्ध असल्याचे वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी सांगितले. कुंडई व मडकई येथील औद्योगिक वसाहतीत 300 क्युबीक मिटर पाण्याच्या टाकीचा व पंपचा पायाभरणी शुभारंभ नुकताच करण्यात आला. यावेळी कवळेचे जिल्हा पंचायत सदस्य गणपत नाईक, वेलिंग प्रियोळचे जिल्हा पंचायत सदस्य दामोदर नाईक, मडकईचे सरपंच शैलेंद्र पणजीकर, कुंडईचे सरपंच सर्वेश गावडे, बांदोडा सरपंच सुखानंद कुर्पासकर, मडकईचे पंचसदस्य विशांत नाईक, शिल्पा गावडे, उपसरपंच संध्या नाईक, दुर्गादास नाईक, सुषमा गावडे, पूजा गावडे, संदीप जल्मी, रुपेश कुंडईकर, मनीषा नाईक, पाणी विभागाचे अभियंते थॉमस लेंडीस, साहाय्यक अभियंते यशवंत मापारी, काशिनाथ सराफ, महेश गावणेकर, तांत्रिक अभियंते मनोज नाईक, एन्क्युब अॅथिकचे प्रकल्प अधिकारी लाला साहेब जगदाळे आदी उपस्थित होते. या प्रकल्पासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री निलेश काब्राल यांनी पूर्ण सहकार्य केलेले आहे. या प्रकल्पाचा खर्च रु. 2 कोटी 75 लाख एन्क्युब अॅथिक्सतर्फे करण्यात येईल, अशी माहिती मंत्री सुदिन ढवळीकर यांनी पुढे बोलताना दिली.

मडकई मतदारसंघात एका महिन्याच्या आत हॉटमिक्स डांबरीकरण - मंत्री ढवळीकर

मडकई मतदारसंघात गेले वर्षभर भूमीगत वीज वाहिन्यांचे काम युद्ध पातळीवर चालू आहे. ते आता पूर्णत्वास आलेले आहे. 15 डिसें. पासून मडकई, कुंडई, बांदोडा, कवळे, दुर्भाट, आडपई या भागातील सर्व रस्ते हॉटमिक्स डांबरीकरण केले जाईल. गेले वर्षभर नागरिकांनी खूप कळ सोसली आहे. वाहनचालकांनाही याची झळ पोचलेली आहे. याची जाण आपल्याला आहे. कर्तव्य भावनेतून ही कामे हाती घेतलेली आहे. एका महिन्याच्या आत हॉटमिक्स डांबरीकरण केले जाईल. त्या संबंधीच्या निविदाही निकालात काढलेल्या आहेत. तसेच 1965 पासून असलेल्या जुन्या वाहिन्याही बदलून नवीन टाकल्या जाईल आणि उच्च व कमी दाबाच्या वाहिन्यातून वीज प्रवाह सुरळीत केला जाईल. त्यामुळे मडकई मतदारसंघाला चकाकी मिळणार आहे. यावेळी मंत्री सुदिन ढवळीकर यांच्याहस्ते श्रीफळ वाढवून व फलकाचे अनावरण केले. स्वागत सर्वेश गावडे यांनी केले. शैलेंद्र पणजीकर यांनी आभार मानले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article