कार-ट्रेलर अपघातात गुजरातमध्ये 10 ठार
06:46 AM Apr 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
वृत्तसंस्था/ अहमदाबाद
Advertisement
गुजरातमधील अहमदाबाद-वडोदरा द्रुतगती मार्गावर नडियादजवळ बुधवारी भीषण अपघात झाला. या रस्ता अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो. भरधाव कारने टेलरच्या मागून धडक दिल्याने हा अपघात झाला. ही कार वडोदराहून अहमदाबादला जात होती. या अपघातानंतर महामार्गावर चक्काजाम झाला होता.
महामार्गावर एर्टिंगा कार टँकरवर आदळून अपघात झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. काही लोकांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिल्यानंतर व्रेन बोलवून कार टँकरखालून बाहेर काढण्यात आली. अपघातानंतर 108 ची टीम तात्काळ दाखल झाली. या घटनेत सुमारे 10 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर जखमींना उपचारासाठी दाखल करण्यात आले. अपघातग्रस्त कार अहमदाबादमधील असून मृत व्यक्तींची ओळख पटविण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू होते.
Advertisement
Advertisement