For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जूनअखेर एकरकमी घरपट्टी भरल्यास १० टक्के सवलत

01:13 PM Jun 21, 2025 IST | Radhika Patil
जूनअखेर एकरकमी घरपट्टी भरल्यास १० टक्के सवलत
Advertisement

सांगली :

Advertisement

महानगरपालिकेच्या हद्दीमधील जे मालमत्ताधारक ३० जूनपर्यंत जे मालमत्ताधारक घरपट्टीची रक्कम एकरकमेत भरतील त्यांना सामान्य करामध्ये दहा टक्के सवलत देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. मालमत्ताधारकांनी आपला मालमत्ता कर एकरक्कमी भरून सामान्य करामध्ये देण्यात येत असलेल्या १० टक्के सवलतीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.. याकरीता ३० जूनपर्यंत शनिवार व रविवार करविभागीय कार्यालय चालू राहणार आहे.

कर भरून सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त सत्यम गांधी यांनी केले आहे. सदरची रक्कम मिळकतधारक आगावू भरत असल्याने सामान्य करात सवलत देण्यात येत आहे. तसेच कराचा भरणा डेबीटकार्ड, क्रेडीटकार्ट, युपीआय व ऑनलाईन स्वरुपात भरण्याची सोय आहे. मालमत्ता देयकामधील क्यूआर कोडद्वारे भरणा करु शकतात. जे मालमत्ताधारक कराचा भरणा ऑनलाईन स्वरुपात करत आहेत त्यांना यो ग्रिन या माध्यमातुन प्रत्येक बिलामध्ये १० ची सवलत दिली जात आहे. आजअखेर ऑनलाईन व भरणा केंद्रावर २७५६१ इतक्या मिळकत धारकांनी सामान्य करात १० टक्के सवलतीचा लाभ घेतला आहे. तरी आपल्या थकीत व चालू कराचा भरणा लवकर भरुन सहकार्य करावे. ज्या मिळकत धारकांना बिलाबाबत शंका असेल अशांनी खालील ठिकाणी संपर्क साधावा. खालील ठिकाणी जून माहिन्यातील साप्ताहिक सुट्टी दिवशी शनिवार व रविवार कार्यालय सुरु ठेवलेले आहे.

Advertisement

मालमत्ता करविभाग, मंगलधाम इमारत, जिल्हापरिषदे समोर, सांगली. शिवाजी मंडई आतील इमारत, प्रभाग समिती २ कार्यालय सांगली. घरपट्टी, विभागीय कार्यालय, मिरज, घरपट्टी, कुपवाड विभागीय कार्यालय, कुपवाड. यामध्ये कर भरण्याची सोय आहे मिळकत धारकांनी एक रक्कमी बिल भरु शकत नसलेस अंशतः पार्ट पेमेंट भरून घेण्याची सोय आहे. मात्र त्यावर सदर सवलत नाही. मात्र मुदतीत रक्कम भरली नाही तर सदर मागणी बिलामधील थकबाकी रक्कमेवर दर महा २ टक्के दंडाची आकारणी होईल. यासाठी मालमत्ता करदात्यांनी ३० जून अखेर कराची रक्कम भरुन १० टक्के सवलतीचा लाभ घ्यावा.

Advertisement
Tags :

.