For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘बर्निंग बस’ दुर्घटनेत 10 भाविकांचा मृत्यू

06:49 AM May 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘बर्निंग बस’ दुर्घटनेत 10 भाविकांचा मृत्यू
Advertisement

25 हून अधिक जखमी : हरियाणात मध्यरात्री हाहाकार

Advertisement

वृत्तसंस्था / चंदीगड

हरियाणात तावडू उपविभागाच्या हद्दीतून जाणाऱ्या कुंडली मानेसर पलवल द्रुतगती मार्गावर शुक्रवारी-शनिवारी मध्यरात्री भाविकांनी भरलेल्या बसला आग लागली. या दुर्घटनेत ठार झालेल्यांची संख्या 10 असून जखमींची संख्या 28 असल्याचे सांगण्यात येत आहे. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वैद्यकीय सूत्रांनी व्यक्त केली आहे. गुऊग्राम लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार राज बब्बर जखमींना पाहण्यासाठी ऊग्णालयात पोहोचले होते.

Advertisement

दुर्घटनेत बळी पडलेले लोक मथुरा आणि वृंदावनला भेट देऊन परतत होते. पोलिसांनी याप्रकरणी अधिक तपास सुरू केला आहे. मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास बसमध्ये ज्वाळा दिसत होत्या. चालत्या बसमध्ये आग लागल्याचे पाहून स्थानिक लोकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत अथक प्रयत्नाने आग आटोक्मयात आणली. बसमधून महिला आणि लहान मुलांसह 60 जण प्रवास करत होते. हे सर्वजण जवळचे नातेवाईक असून ते पंजाबमधील लुधियाना, होशियारपूर आणि चंदीगड येथील रहिवासी होते.

मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास चालत्या बसमध्ये आग लागल्याचे दिसले. काही लोकांनी हा प्रकार पाहिल्यानंतर आरडाओरड करून चालकाला बस थांबवण्यास सांगितले. मात्र बस न थांबल्याने एका तरुणाने मोटारसायकलवरून बसचा पाठलाग करून चालकाला आगीची माहिती दिली. यानंतर बस थांबली मात्र तोपर्यंत बसमधील आग खूपच तीव्र झाली होती. गावकऱ्यांनी आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न करून पोलिसांनाही कळवले. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या उशिरा आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.