For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सरकार पाडण्यासाठी 1 हजार कोटी राखीव

06:44 AM Sep 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
सरकार पाडण्यासाठी 1 हजार कोटी राखीव
Advertisement

भाजप आमदार बसनगौडा पाटील-यत्नाळ यांचा स्वपक्षीय नेत्यावर आरोप

Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

राज्यातील काँग्रेस सरकार पाडण्यासाठी आमच्या पक्षातील नेते 1 हजार कोटी रुपये राखून ठेवले आहे, असा आरोप भाजपचे कायमस्वरुपी असंतुष्ट नेते आणि आमदार बसनगौडा पाटील-यत्नाळ यांनी स्वपक्षावरच केला आहे. दावणगेरे येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, राज्यात सत्तेवर असलेल्या काँग्रेस सरकारला पाडवून आपण मुख्यमंत्री होण्यासाठी भाजपमधील एका नेत्याने 1 हजार कोटी रु. तयार ठेवले आहेत. डिसेंबर महिन्यात सरकार कोसळणार असल्याचा त्यांचा अंदाज आहे, असे म्हणत यत्नाळ-पाटील यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष वी. वाय. विजयेंद्र यांच्यावर अप्रत्यक्षपणे आरोप केला.

Advertisement

यापूर्वी भाजप हायकमांडला मुख्यमंत्रिपदासाठी 2500 कोटी ऊपये कोण देतील, त्याला मुख्यमंत्रिपद मिळेल, असे सांगून त्यांनी मोठी खळबळ उडवून दिली होती. आता भाजपचा एक नेता मुख्यमंत्री होण्यासाठी 1000 कोटी ऊपये देत आहे, असे सांगत यत्नाळ यांनी आणखी एक बॉम्ब टाकला आहे. मात्र, एक हजार कोटी ऊ. राखीव ठेवलेले भाजपचे नेते कोण हे उघड झालेले नाही. काँग्रेस सरकार पाडण्याचा प्रयत्न आमच्या पक्षातील नेते करत आहे, पण सरकार अस्थिर करणे वाटते तितके सोपे नाही. त्यांना मुख्यमंत्री होण्यासाठी आम्ही पाठिंबा देऊच शकत नाही. गेल्यावेळेप्रमाणे सर्वच आमदार त्या नेतृत्वाला पाठिंबा देणार नाहीत. त्यांच्या म्हणण्यानुसार सरकार स्थापने तितके सोपे नाही, असे त्यांनी सांगितले.

प्रत्येकाला मुख्यमंत्री व्हायचे आहे. मात्र, नशीब असलेलेच मुख्यमंत्री होतात. यावषी डिसेंबरमध्ये राज्यात मोठी राजकीय क्रांती घडविण्याचा प्रयत्न भाजपचे अनेक सदस्य करत आहेत. भाजपच्या एका नेत्याने ऑपरेशन कमळ राबवून काँग्रेस सरकार पाडण्यासाठी भाजपच्या एका नेत्याने 1000 कोटी ऊपये गोळा केले आहेत. काहींसाठी आमदार खरेदी करणे अगदी सोपे आहे. कारण यापूर्वीही अशीच खरेदी करून काही लोकांनी दोनदा मुख्यमंत्री झाले होते. आता काहीजण त्यांचा टेड सुरू ठेवण्यास तयार आहेत. पक्षाचे हायकमांड हे होऊ देणार नाही, असेही यत्नाळ यांनी स्पष्ट केले.

काही लोकांना कोणाचीही गरज नाही. केवळ त्यांना मुख्यमंत्री व्हायचे आहे. आम्हाला पक्षाचे हित महत्त्वाचे आहे. वर्चस्वासाठी पक्ष कुणाच्या हातात देता येत नाही. यापूर्वी एका व्यक्तीला सर्वकाही देण्याचे काय झाले हे सर्वांनाच माहीत आहे. मात्र, ऑपरेशन कमलला आपण सहमत नाही. गेल्यावेळी ऑपरेशन कमळ राबविल्यानंतर आलेल्या 17 जणांमुळे भाजपचे खूप हाल झाले आहेत. आता ती परिस्थिती पुन्हा येऊ नये. काँग्रेसचे सरकार पडल्यानंतर आम्ही निवडणुकीला सामोरे जाणे गरजेचे आहे. जनतेचा आशीर्वाद मिळवत जिंकून सत्तेत यायचे आहे. परिणामी, ऑपरेशन कमळ सारखी भ्रष्टाचाराची व्यवस्था संपुष्टात येईल, असेही ते म्हणाले.

Advertisement
Tags :

.