महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

मुख्यमंत्र्यांचं कोल्हापूरात ठाण...राज्यात इतरही कामे; आताच कसा वारसा आठवला- सतेज पाटील

07:00 PM Apr 29, 2024 IST | Abhijeet Khandekar
Satej Patil
Advertisement

मुख्यमंत्र्यांनी राज्यातील इतर सगळ्या गोष्टी सोडून कोल्हापुरातच का ठाण मांडले आहे हे याचं कारण अजून कळत नसून मोदींची सभा जरी झाली असली तरी कोल्हापूरामध्ये काही फरक पडत नसल्याचं काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी म्हटलं आहे. तसेच स्वत:ला राजर्षी शाहू महाराजांचे वंशज म्हणणाऱ्या लोकांना आताच कशी कोल्हापूरची आठवण झाली असा सवाल करताना स्वताच्या पायाखालील वाळू सरकल्यानेच भाजपने त्यांना आणण्यासाठी चार्टर्ट विमान पाठवल्याची टीका सतेज पाटलांनी केली आहे.

Advertisement

१ मेला महाविकास आघाडीची रॅली कोल्हापूरातील गांधी मैदानामध्ये होत आहे. या सभेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची विषेश उपस्थिती असणार आहे. या जाहीर सभेसाठी गांधी मैदानावर महाविकास आघाडीकडून जोरात तयारी केली जात असून त्यासंदर्भातील अढावा घेण्यासाठी आले असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

Advertisement

इतर कामे सोडून मुख्यमंत्र्यांचे कोल्हापूरात ठाण...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोल्हापूरातील पाठोपाठ दौरा आणि भाजपने कोल्हापूरच्या दोन्ही जागांमध्ये घातलेलं विशेष लक्ष यामुळे आमदार सतेज पाटील यांनी खोचक सवाल उपस्थित केला आहे. राजर्षी शाहू महाराजांचा विचार दिल्लीत पोहोचला पाहिजे अशी सर्वसामान्य जनतेचा विचार असून शाहू महाराज निवडणुकीला उभारले त्यावेळी भाजपकडून एव्हढी ताकद लावली जाईल याची कल्पना नव्हती. शाहू महाराज आणि शिवाजी महाराजांच्या विचाराला ते विरोध का करत आहेत ? मात्र मुख्यमंत्री राज्यातील इतर सगळ्या गोष्टी सोडून कोल्हापुरातच का बसलेत हे कळत नाही.

मोदी येऊन गेल्याने राज्यात काही फरक नाही...
मोदींच्या जाहीर सभेबाबत पत्रकारांनी त्यांना छेडले असता त्यांनी भाजपला महाराष्ट्राबद्दलचा कॉन्फिडन्स नसल्यानेच पाच टप्प्यात निवडणुका घेतल्याचा आरोप केला. त्यामुळेच महाराष्ट्रामध्ये अजून किमान दहा वेळा मोदी येतील. पण मोदी येऊन गेल्यामुळे राज्यात काही फरक पडणार नाही. महागाई, बेरोजगारी या ऐवजी घटना बदलण्यासंदर्भात त्यांच्या खासदारांची वक्तव्य येत असल्यानेच रोज्यातील लोकांनी महाविकास आघाडी सोबत राहण्याचा निर्णय घेतलेला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

भाजपने पाठवले चार्टर्ड विमान...
राजवर्धन कदमबांडे यांनी काल पत्रकार परिषद घेऊन आपणच राजर्षी शाहू महाराजांचे खरे वारस असल्याचं सांगितले तसेच सध्याचे शाहू छत्रपती हे फक्त संपत्तीचे वारस असल्याचाही त्यांनी आरोप केला. यावर प्रतिक्रिया देताना सतेज पाटलांनी यामागे भाजपचा हात असल्याचा आरोप केला आहे. कदमबांडे यांना आत्ताच आपल्या वारसा कसा आठवला ? एकदा ते म्हणतात हा आमचा घरगुती विषय आहे ? तर कधी त्याचं राजकारण करतात. भाजपने त्यांना चार्टर विमान पाठवून कोल्हापुरात आणले असून भाजपच्या नेत्यांच्या पायाखालची वाळू आता सरकली आहे. असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

तसेच, भाजपकडे कुठलाही मुद्दा नसून काहीतरी उकरून काढायचं आणि लोकांची दिशाभूल करण्याचं काम त्यांनी सुरू केलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज या महामानवांचा वापर इतिहास बदलण्यासाठी करण्याचे काम भाजपचे लोक करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

 

Advertisement
Tags :
1 MayGandhi Maidankolhapursharad pawaruddhav thackeray
Next Article