महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

1 लाख वर्षे जुन्या पाउलखुणा

07:00 AM Feb 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

शतकांपेक्षा जुनी सामग्री आणि खुणा आपल्याला त्या काळात माणूस कसा दिसत होता, ते कशाप्रकारे जगत होते याबद्दल माहिती देत असतात. याच विषयावर आधारित संशोधन मोरक्कोमध्ये झाले आहे. येथे एक लाख वर्षे जुने पायांचे ठसे मिळाले आहेत. मोरक्को, फ्रान्स, जर्मनी आणि स्पेनच्या वैज्ञानिकांच्या एका आंतरराष्ट्रीय पथकाने हे संशोधन सायन्स जर्नल नेचरमध्ये प्रकाशित करविले आहे. यात चांगल्याप्रकारे संरक्षित मानवी पाऊलखुणा सापडल्याचे नमूद आहे. या पाऊलखुणा 1 लाख वर्षे जुन्या असल्याचे मानले जातेय. पायांचे ठसे 5 व्यक्तींचे असल्याचे मानण्यात येत आहे. मोरक्कोतील एका शहरात समुद्री खडकावर या पाऊलखुणा आढळून आल्या आहेत.

Advertisement

जून 2022 मध्ये पुरातत्व तज्ञ माउन्सेफ सेड्राती यांना लाराचे शहरात विविध आकारांच्या पाऊलखुणा दिसून आल्या होत्या. पहिला ठसा मिळाल्यावर आम्हाला त्याच्या प्राचीन महत्त्वाबद्दल खात्री नव्हती, परंतु नंतर मग दुसरा आणि तिसरा ठसा मिळाला, मग मिळतच गेल्याचे माउन्सेफ यांनी सांगितले आहे. प्रारंभिक पाऊलखुणा  होमोने (सेपियन्स) सुमारे 1 लाख वर्षांपूर्वी वाळुयुक्त समुद्र किनाऱ्यावर सोडल्या होत्या. एकूण 85 पाऊलखुणा आढळून आल्या आहेत. 5 जणांच्या समुहाकडून या पाऊलखुणा निर्माण झाल्या असाव्यात. उत्तर आफ्रिका आणि दक्षिण भूमध्य समुद्रात मिळालेले हे पहिले प्रारंभिक मानव ट्रॅक आहे. हे पाचही जण वेगवेगळ्या वयाचे असावेत असेही त्यांचे सांगणे आहे.
Advertisement

हे लोक येथे किती काळापर्यंत राहिले असावेत हे शोधून काढण्याचा प्रयत्न आता केला जातोय. वैज्ञानिकांच्या टीमने ड्रोनच्या मदतीने 461 छायाचित्रांचे प्रिंट प्राप्त केले आहे. आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत या पाऊलखुणांचा आकार तसेच प्राचीन लोकांचे अचूक वय निश्चित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. वैज्ञानिकांना येथे आणखी काही सामग्री मिळाली असून त्यांचा वापर महिलांकडून करण्यात आला असावा असे त्यांचे मानणे आहे. येथे भट्टीही मिळाली असून यामुळे प्राचीन माणूस आग कशाप्रकारे पेटवावी हे जाणून होता हे स्पष्ट होते. तसेच हाडांचे अवशेष आणि दगडी अवजारंही प्राप्त झाली आहेत. प्राचीन मानव भोजनासाठी मृत जनावरांवर निर्भर होता हे स्पष्ट होते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article