For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राजकोट गेमझोन आगप्रकरणी 1 लाख पानी आरोपपत्र

07:00 AM Jul 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
राजकोट गेमझोन आगप्रकरणी 1 लाख पानी आरोपपत्र
Advertisement

365 साक्षीदार, 15 आरोपी : जलदगती न्यायालयात सुनावणी शक्य

Advertisement

वृत्तसंस्था /राजकोट

गुजरातच्या राजकोटमध्ये 25 मे रोजी टीआरपी गेमझोनमध्ये लागलेल्या आगीप्रकरणी पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले आहे. 2 महिन्यांच्या आत न्यायालयासमोर 15 जणांच्या विरोधात 1 लाखाहून अधिक पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. भाजप नेत्यांना याप्रकरणी क्लीनचिट देण्यात आल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचे काँग्रेसचे सांगणे आहे. राजकोटच्या टीआरपी गेमझोनमध्ये झालेल्या भयानक दुर्घटनेने पूर्ण देशाला हादरवून टाकले होते. या दुर्घटनेत 27 जणांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी विशेष तपास पथकाकडून चौकशी करण्यात आली होती. या दुर्घटनेप्रकरणी 16 जणांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला होता. आरोपींमध्ये गेमझोनचा मालक आणि राजकोट महापालिकेचे अधिकारीही सामील होते. गेमझोनचा एक मालक प्रकाश जैनचाही या दुर्घटनेत मृत्यू झाला होता.

Advertisement

याप्रकरणी 365 साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले आहे. पुराव्यांसह 1 लाख पानांचे आरोपपत्र राजकोटच्या न्यायालयासमोर सादर करण्यात आले आहे. राज्य सरकारकडून मंजुरी मिळाल्यावर हा खटला जलदगती न्यायालयात वर्ग करण्याची तयारी आहे. पोलिसांच्या आरोपपत्रानुसार आरोपींना 10 वर्षांपर्यंतची शिक्षा होऊ शकते. तपासादरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज हस्तगत केले होते. प्रत्यक्षदर्शी आणि गेमझोनमधील कर्मचाऱ्यांचेही जबाब नोंदविण्यात आले आहेत. आग लागल्याच्या तीन ते चार मिनिटातच आगीने विक्राळ रुप धारण केले होते. ज्या क्षेत्रात वेल्डिंग करण्यात आले हेते, त्याच्या खाली आणि आसपास मोठ्या प्रमाणत रासायनिक फॉर्म शीटचा वापर करण्यात आला होता. तसेच निर्मिती सामग्रीत मोठ्या प्रमाणात लाकडाचाही वापर झाला होता. यामुळे आग वेगाने फैलावली होती.

अवैध होता गेमझेन

2021 मध्ये सुरू झालेला हा गेमझोन पूर्णपणे अवैध होता. याच्या मालकांनी राजकोट महापालिकेकडून कुठल्याही प्रकारची मंजुरी घेतली नव्हती. गेमझोनमध्ये अग्निप्रतिबंधक उपाययोजनाच करण्यात आली नव्हती.

Advertisement
Tags :

.