सोनुर्ली हायस्कूलच्या इमारत दुरुस्तीसाठी शिक्षणमंत्र्यांकडून १ लाखाची मदत
न्हावेली / वार्ताहर
माऊली माध्यमिक विद्यालय सोनुर्ली या विद्यालयाच्या इमारत दुरुस्तीचे काम सुरु असून सदर कामासाठी श्री देवी माऊली शिक्षण प्रसारक मंडळ,विद्यालयाचे,शिक्षक,शिक्षकेतर,कर्मचारी,पंचक्रोशीतील ग्रामस्थ,शिक्षणप्रेमी व माजी विद्यार्थी यांच्या मदतीने सुरु आहे.सदर काम पूर्णत्वास जाण्यासाठी शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्याकडून एक लाखाची मदत करण्यात आली.या निधीचे वितरण दिपकभाई केसरकर मित्र मंडळाचे अध्यक्ष राजन पोकळे यांच्याहस्ते करण्यात आले.यावेळी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, नारायण राणे,आबा केसरकर, गजानन नाटेकर, सोनुर्ली गावचे मुख्य मानकरी तथा विद्यालयाचे ज्येष्ठ कर्मचारी राजेंद्र गावकर, देवी माऊली शिक्षण प्रसारक मंडळ सोनुर्लीचे अध्यक्ष अनंत परब, सचिव तथा शालेय समिती अध्यक्ष नागेश गावकर, सहसचिव गोविंद धडाम,सरपंच नारायण हिराप, मुख्याध्यापक अरुण तेरसे, राज्य शासन पुरस्कार प्राप्त तथा विद्यालयाचे उपक्रमशील शिक्षक पांडुरंग काकतकर उपस्थित होते . या विद्यालयाचे विविध उपक्रम व उत्कृष्ट निकाल याबद्दल राजन पोकळे यांनी समाधान व्यक्त करून शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे अभिनंदन केले तसेच ग्रामीण भागात दर्जेदार शैक्षणिक सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेल्या श्री देवी माऊली शिक्षण प्रसारक मंडळाचे विशेष कौतुक केले. शैक्षणीक कार्यक्रमांसाठी यापुढेही असेच सहकार्य आपल्याकडून मिळत राहील अशी ग्वाही दिली.विद्यालयाचे शिक्षक पांडुरंग काकतकर यांनी सदर मदत मिळणेसाठी विषेश पाठपुरावा केला.मुख्याध्यापक अरुण तेरसे यांनी या देणगीबद्दल शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांचे आभार मानले.