For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पथदर्शी प्रकल्पांतर्गत 1 लाख 21 हजार घरपोच सेवा

05:57 PM Jan 19, 2025 IST | Radhika Patil
पथदर्शी प्रकल्पांतर्गत  1 लाख 21 हजार  घरपोच सेवा
Advertisement

कोल्हापूर / बाळासाहेब उबाळे : 

Advertisement

जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या घरपोच सेवा या पथदर्शी प्रकल्पाची अंमलबजावणी 15 ऑगस्टपासून जिह्यातून झाली आहे. सर्वसामान्य नागरिकांना चांगल्या प्रकारे शासकीय सेवांचा लाभ वितरीत करण्यासाठी या नाविण्यपूर्ण उपक्रमाची सुरुवात झाली आहे. त्याप्रमाणे 15 ऑगस्ट 2024 पासून गेल्या तीन महिन्यात 1 लाख 12 हजार 735 घरपोच सेवा देण्यात आली आहे.

शासनाच्या विविध सेवांचे वितरण योग्य पध्दतीने आणि कमी वेळेत होण्यासाठी सेवा हमी कायद्याची अंमलबजावणी शासन स्तरावरून होत आहे. जिल्ह्यात 15 ऑगस्टपासून सेवा हमी पथदर्शी कार्यक्रमाच्या अंमलबजावणीला सुरूवात झाली आहे. सेवा हमी अंतर्गत वितरित करणाऱ्या योजनांसाठी या पथदर्शी प्रकल्पाद्वारे सर्वांना सेवांची माहिती देणे, आवश्यक सेवांची निश्चिती करणे आणि सेवा म्हणजेच संबंधित दाखले वितरीत करणे यांचा समावेश आहे. सेवा केंद्राचे प्रतिनिधी नी निवडलेल्या गावांमध्ये व शाळा महाविद्यालयांमध्ये जाऊन काम केले आहे. तीन महिन्याच्या कालावधीत आलेल्या अर्जापैकी 1 लाख 21 हजार 735 दाखल्यांचे घरपोच वितरण करण्यात आले.

Advertisement

प्रकल्पाची प्रगती

घरपोच सेवा वितरण - तीन महिन्यात 1 लाख 21 हजार 735 घरपोच सेवा

व्हॉट्सअॅप चॅटबॉटचा वापर - सेवाबाबत माहिती देण्यासाठी तयार केलेल्या चॅटबॉटला 1,240 हिट्स प्राप्त झाल्या आहेत. प्रशिक्षण शिबीर-शाळा व महाविद्यालयामध्ये 345 शिबीरे घेऊन करुन नागरिकांना डिजिटल सेवांचा लाभ दिला

जिल्ह्यात प्रकल्पाला प्रतिसाद

कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात घरपोच सेवा हा पथदर्शी सुरु केला.15 ऑगस्ट 2024 रोजी या प्रकल्पाच्या अंमलबजावणीला प्रारंभ झाला.या प्रकल्पाच्या माध्यमांतून शासानाच्या विविध सेवांचे वितरण करण्यात येत आहे.आतापर्यंत या प्रकल्पांतर्गत 1 लाख 21 हजार 735 घरपोच सेवा पुरवल्या आहेत.नुकताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शंभर दिवसांचा सात कलमी कार्यक्रम जाहीर केला आहे.या शंभर दिवसात अधिकाधिक लोकापर्यंत पोहोचण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.

                                                              विजय पवार- तहसीलदार-सामान्य प्रशासन विभाग

Advertisement
Tags :

.