For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मार्च एंडिंगची घाई अन् सायबर चोरही अ‍ॅक्टिव्ह

01:55 PM Jan 19, 2025 IST | Radhika Patil
मार्च एंडिंगची घाई अन् सायबर चोरही अ‍ॅक्टिव्ह
Advertisement

कोल्हापूर / संतोष पाटील : 

Advertisement

केंद्रीय गृह विभागाच्या आकडेवारीनुसार मागील नऊ महिन्यात साडे अकरा हजार रुपयांना गंडा सायबर गुन्हेगारांनी घातला आहे. मार्च एंडींगजवळ आल्याने आर्थिक वर्ष समाप्तीच्या कारणाने बँक केवायसी अपडेट करण्यासह इतर अपडेटचे मेसेजनी इनबॉक्स फुल्ल झालेत. युपीआय वापरकर्त्यांना लक्ष करत सायबर गुन्हेगारही अॅक्टिव्ह झाले आहेत. युपीआयच्या माध्यमातून बँकिंग करणाऱ्यांनी अधिक सजग राहण्याची गरज आहे.

2016च्या नोटाबंदीनंतर ऑनलाईन पेमेंट करण्याकडे ओढा वाढला आहे. सध्या 90 टक्के व्यवहार तसेच खरेदी ऑनलाईन पेमेंटच्या माध्यमातून होत असते. ऑनलाईन पेमेंट सिस्टीम वेगाने आपल्या जीवनाचा भाग बनली आहे. त्यासाठी युपीआय म्हणजेच युनिफाईड पेमेंट इंटरफेसचा प्रामुख्याने वापर केला जातो. या ऑनलाईन पेमेंटचा वापर करताना फसवणुकीचे अनेक प्रकार समोर येत आहेत. युपीआय फिशिंगच्या माध्यमातून सायबर गुन्हेगार बँक खाती रिकामी करत आहेत.

Advertisement

बँकेच्या खात्याबाबत तांत्रिक कारण सांगत सायबर गुन्हेगार कॉल करतात. तांत्रिक अडचण दूर करण्यासाठी लिंक पाठवणार आहोत आणि सोबत एक नंबरही देणार आहोत, असे सांगतात. बँकेत व्यवहारासाठी जो नंबर वापरता त्या फोनवरून ही लिंक दिलेल्या नंबरवर पाठवा असे सांगितले जाते. आता साधारणपणे लिंकवर क्लिक करायचं नाही याची लोकांना बऱ्यापैकी माहिती झाली आहे. याउलट आता नवा फंडा काढला आहे. आलेली लिंक उघडायची गरज नाही, तर आहे ती लिंक फॉरवर्ड करायची. या लिंक आणि ओटीपीमुळं गुन्हेगाराला संबंधित व्यक्तीच्या युपीआय वॉलेटचा अॅक्सेस मिळतो. तुमच्या युपीआय अकाऊंटचा पिनही त्यांना बदलता येतो. त्यासाठी सिमची गरज लागत नाही. त्यानंतर गुन्हेगार स्वत:च्या बँक खात्यासारखं त्यांचं बँक खातं वापरतात आणि त्यातली सगळी रक्कम त्यांना हव्या त्या अकाऊंटमध्ये वळवतात.

  • ही घ्या खबरदारी... 

ऑनलाईन फसवणूक टाळण्यासाठी लिंक क्लिक न करणे, ओटिपी किंवा पासवर्ड शेअर न करणे, आमिषाला बळी न पडणे. समोरचा व्यक्ती बोलतोय त्यावर लगेच विश्वास ठेवायचा नाही. बँकेच्या किंवा इतर कुठल्याही अधिकृत नंबरवरून फोन आला असेल तर ठिक अन्यथा बोलणं फार वाढवूच नये. अशाप्रकारची फसवणूक ही प्रामुख्याने ई-कॉमर्सचा खूप वापर करणारे तसेच गुगलवर यासंबंधी सर्च करणाऱ्यांबरोबर होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे अशा लोकांना अधिक सावध राहावे.

  • घाबरवण्याचा प्रकार

डिजिटल अरेस्ट, मोठ्या अधिकाऱ्यांच्या, सरकारी कार्यालयांच्या नावाने फोन करून फसवणे असे प्रकार होतात. त्यामुळे फसवणूक करताना गुह्याचा प्रकार किंवा चेहरा वेगळा असला तरी पडद्यामागे फसवणुकीचं तंत्रज्ञान तेच आहे. यातले बहुतांश प्रकार हे घाबरल्यामुळे होतात. गोड बोलून जाळ्यात अडकलं किंवा घाबरून तडजोडीला तयार झालं की सायबर गुन्हेगारांना संधी मिळते आणि ते त्याचा फायदा उचलतात असतात. मार्च एंडींगची आर्थिक संबंधी कामे उकरण्याची घाई सुरू असताना ओटीपी, तसेच अपेडेटींगसाठी कॉल आणि मेसेज येण्याची संख्यावही वाढणार आहे. यामुळे अधिक सजग राहणे, अनोळखी कॉलवर मोजकेच बोलण्याची गरज आहे.

Advertisement
Tags :

.