महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

विवेकसागर प्रसादला 1 कोटीचे बक्षीस

06:08 AM Aug 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/भोपाळ

Advertisement

2024 च्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत हॉकी या क्रीडा प्रकारात पुरूष विभागात भारतीय हॉकी संघाने कास्य पदक मिळविले. या हॉकी संघातील प्रमुख खेळाडू विवेकसागर प्रसादला मध्यप्रदेश शासनातर्फे 1 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

Advertisement

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत गुरूवारी झालेल्या कास्यपदकासाठीच्या लढतीत भारताने बलाढ्या स्पेनचा 2-1 अशा गोल फरकाने पराभव केला. ऑलिम्पिकच्या इतिहासामध्ये तब्बल 52 वर्षानंतर भारतीय पुरूष हॉकी संघाने सलग दोनवेळा कास्यपदक मिळविण्याचा नवा पराक्रम केला. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी विवेकसागर प्रसादशी दूरध्वनीव्दारे संपर्क साधत त्याला शुभेच्छा व बक्षीस जाहीर केले. विवेकसागर प्रसाद सध्या मध्यप्रदेशमध्ये मानद उपपोलीस प्रमुख म्हणून कार्यरत आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article