महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

ऑगस्टमध्ये 1.74 लाख कोटी जीएसटी जमा

06:33 AM Sep 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

संकलनात वार्षिक आधारावर 10 टक्क्यांची वाढ

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

ऑगस्ट 2024 मध्ये सकल वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) संकलन 1.74 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. वार्षिक आधारावर यात 10 टक्क्मयांनी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. ऑगस्ट 2023 मध्ये देशाचे जीएसटी संकलन 1.59 लाख कोटी रुपये होते. तर ऑगस्ट 2024 मध्ये ते 1.74 लाख कोटींच्या पुढे पोहोचल्याने अर्थव्यवस्थेला मोठा दिलासा मिळाला आहे. यापूर्वीच्या महिन्यात म्हणजेच जुलै महिन्यात जीएसटी संकलन 1.82 लाख कोटी रुपये झाले होते.

महसूल अहवालानुसार, ऑगस्टच्या महिन्यात मजबूत जीएसटी संकलन झाले असून हा डेटा सर्व क्षेत्रातील वस्तू आणि सेवा कर वाढ दर्शवत आहे. ऑगस्ट 2024 पर्यंत राज्ये/केंद्रशासित प्रदेशांसोबत सेटल केलेले आकडे बघितले तर एकूण संकलनात राज्यांचा वाटा वाढला आहे. देशांतर्गत महसूल 9.2 टक्क्मयांनी वाढून 1.25 लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे, तर आयात महसूल 12.1 टक्क्मयांनी वाढला आहे. परताव्यासाठी समायोजन केल्यानंतर निव्वळ देशांतर्गत महसूल केवळ 4.9 टक्क्मयांनी वाढून 1.11 लाख कोटी रुपये झाला, तर आयजीएसटी महसूल 11.2 टक्क्मयांनी जास्त होता. गेल्या महिन्यात निव्वळ देशांतर्गत महसूल 14.4 टक्क्मयांनी वाढून 1.66 लाख कोटी रुपये झाला आहे. निव्वळ जीएसटी महसूल 1.5 लाख कोटी रुपये होता. हे उत्पन्न गेल्यावषीच्या तुलनेत 6.5 टक्के अधिक आहे. एकूण परतावा रक्कम 24,460 कोटी रुपये होती, त्यापैकी 58 टक्के देशांतर्गत परतावा होता, तर उर्वरित निर्यातदार परतावा होता.

मे 2024 मध्ये सरकारचे जीएसटी संकलन 1.73 लाख कोटी रुपये होते. जे गेल्या वषी मे महिन्यातील जीएसटी संकलनापेक्षा विक्रमी 10 टक्के अधिक होते. गेल्यावषी मे महिन्यात हा आकडा 1.57 लाख कोटी रुपये जमा झाला होता.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article