For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तामिळनाडूत ‘मिचौंग’मुळे 1.20 कोटी लोक प्रभावित

07:00 AM Dec 08, 2023 IST | Tarun Bharat Portal
तामिळनाडूत ‘मिचौंग’मुळे 1 20 कोटी लोक प्रभावित
Advertisement

 सलग चौथ्या दिवशी शाळा-महाविद्यालये बंद

Advertisement

वृत्तसंस्था /चेन्नई

बंगालच्या उपसागरातून निर्माण झालेल्या मिचौंग चक्रीवादळामुळे तामिळनाडूतील 1 कोटी 20 लाखांहून अधिक लोक प्रभावित झाले आहेत. चेन्नई, तिऊवल्लूर, कांचीपुरम आणि चेंगलपट्टू जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक विध्वंस झाला असून अजूनही जनजीवन पूर्वपदावर आलेले नाही. तीन दिवसांपासून चेन्नई शहरातील अनेक भागात वीज आणि इंटरनेट बंद आहे. चक्रीवादळाच्या तडाख्यात तामिळनाडूच्या किनारपट्टी भागात संपत्तीची प्रचंड हानी झाली आहे. काही भागात रस्ते आणि रेल्वेमार्गांचे नुकसान झाल्यामुळे वाहतूक यंत्रणा अद्यापही कोलमडलेली आहे. मिचैंगने आंध्रप्रदेशात 770 किलोमीटरचे रस्ते खराब झाले आहेत. तसेच झाडे उन्मळून पडल्याने वीजसेवाही कोलमडली आहे. जीवितहानीबरोबरच पशुधनाचेही नुकसान झाल्याच्या घटना घडल्या आहेत. गुऊवारी चेन्नईला जाणाऱ्या आणि येणाऱ्या 15 रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या. तसेच 4 डिसेंबरपासून सर्व शाळा, महाविद्यालये बंद आहेत. भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरद्वारे पूरग्रस्त भागात अन्नपुरवठा व मदत सामग्री पोहोचवण्यात येत आहे. चेन्नईमध्ये एकाच दिवसात सर्वाधिक 50 सेंमी पावसाची नोंद झाली आहे. या पुरामुळे 20 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात 47 वर्षांनंतर गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. चक्रीवादळाच्या प्रभाववामुळे राज्यात 2 दिवसांत 3 महिन्यांचा पाऊस झाला, असे खासदार टीआर बालू यांनी गुरुवारी संसदेत सांगितले. तर मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून 5,060 कोटी ऊपयांची मदत मागितली आहे.

Advertisement

राजनाथ सिंह यांच्याकडून हवाई पाहणी

केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी तामिळनाडूतील पूरग्रस्त भागाचे गुरुवारी हवाई सर्वेक्षण केले. केंद्राने पूरग्रस्त मदतीचा दुसरा हप्ता जारी केला आहे. याअंतर्गत आंध्रप्रदेशला 493.60 कोटी ऊपये आणि तामिळनाडूला 450 कोटी ऊपये देण्यात आले आहेत. दोन्ही राज्यांना दिलेल्या मदतीच्या पहिल्या हप्त्यात समान रक्कम देण्यात आली, असे त्यांनी चेन्नई येथे सांगितले.

Advertisement
Tags :

.