सीमकार्ड हॅक करुन दोन लाखांची चोरी
सांगली :
पोलीस दलात कार्यरत एका कर्मचाऱ्याचे मोबाईलमधील सीम कार्ड हॅक करुन त्याच्या बँक खात्यातील २ लाख २९ हजारची रक्कम परस्पर काढून घेण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत झाकिरहुसेन अल्लाबक्ष कालेकर (रा. प्लॉट क्र. ८८, म. गांधी कॉलनी, जुना कुपवाड रस्ता, सांगली) यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली आहे. हा प्रकार दि. २० ऑगस्ट रोजी दुपारी ३.३० ते दि. २२ ऑगस्ट रोजी रात्री ११ या कालावधीत घडला.
घटनेची माहिती अशी, संशयिताने एका क्रमांकावरुन फिर्यादी झाकीरहुसेन कालेकर SECURITY BREACH Data यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर फिर्यादी कालेकर यांच्या अॅ क्सेस, एचडीएफसी, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ बडोदा या बँकेचा डाटा मिळविला. संशयिताने कालेकर यांचे सीमकार्ड हॅक करुन त्यांच्या खात्यातील २ लाख २९ हजार रुपये परस्पर काढून घेतले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर कालेकर यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली. पोलिसांनी फसवणूक करणाऱ्या अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.