कोल्हापुरातील हॉकी स्टेडियमसाठी केंद्र सरकारकडून 1.37 कोटींचा निधी
खेलो इंडिया योजनेअंतर्गत निधी मंजूर; खासदार धनंजय महाडिक यांच्या पाठपुराव्याला यश
कोल्हापूर :
राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी नुकतीच केंद्रीय युवा आणि क्रीडा राज्यमंत्री श्रीमती रक्षा खडसे यांची नवी दिल्लीत भेट घेतली. या भेटीत कोल्हापूर येथील मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमच्या विकासासाठी मंजूर निधीच्या शेवटच्या टप्प्यातील ₹1 कोटी 37 लाखांचा विषय मांडण्यात आला.
कोल्हापूर महापालिकेच्या अखत्यारीत असलेल्या या स्टेडियममध्ये खेलो इंडिया योजनेअंतर्गत अॅस्ट्रो टर्फ आणि इतर सुविधांची उभारणी करण्यात आली आहे. केंद्र सरकारने या प्रकल्पासाठी भरघोस निधी मंजूर केला होता. मात्र शेवटच्या टप्प्यातील ₹1.37 कोटींचा निधी अद्याप मिळाला नव्हता.
खासदार महाडिक यांनी या निधीसंदर्भात केंद्रीय राज्यमंत्री खडसे यांचे लक्ष वेधून घेतले. त्यांनी याबाबत अधिकृत पत्र देऊन निधी तातडीने मंजूर करण्याची विनंती केली. त्यांच्या या पाठपुराव्यानंतर तत्काळ अंतिम टप्प्याचा निधी मंजूर करण्यात आला आणि कोल्हापूर महापालिकेच्या खात्यावर वर्ग करण्यात आला.
खासदार महाडिक यांनी या सहकार्याबद्दल केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षा खडसे यांचे आभार मानले आहेत. या निधीमुळे ध्यानचंद हॉकी स्टेडियम कोल्हापुरातील हॉकी खेळाडूंना आधुनिक आणि परिपूर्ण सुविधा देणारे मैदान ठरणार आहे.
खेलो इंडिया योजनेअंतर्गत निधी मंजूर; खासदार धनंजय महाडिक यांच्या पाठपुराव्याला यश
नवी दिल्ली : राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी नुकतीच केंद्रीय युवा आणि क्रीडा राज्यमंत्री श्रीमती रक्षा खडसे यांची नवी दिल्लीत भेट घेतली. या भेटीत कोल्हापूर येथील मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमच्या विकासासाठी मंजूर निधीच्या शेवटच्या टप्प्यातील ₹1 कोटी 37 लाखांचा विषय मांडण्यात आला.