होय, सचिन-सेहवागपुन्हा सलामीला खेळणार!
रायपूर : सचिन-सेहवाग या जोडीने एककाळ प्रतिस्पर्ध्यांची यथेच्छ धुलाई करत एकापेक्षा एक पराक्रम गाजवले होते. आता हीच जोडी येथे 5 मार्चपासून सुरू होणाऱया रोड सेफ्टी विश्व क्रिकेट मालिकेसाठी देखील भारतीय लिजेंण्डस संघातर्फे सलामीला फलंदाजीला उतरणार आहे. भारताच्या लिजेंड्स संघाची घोषणा करण्यात आली असून या स्पर्धेत यजमान भारतासह श्रीलंका, विंडीज, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि बांगलादेश संघांचा समावेश आहे.
भारतीय लिजेंड्सचा पहिला सामना 5 मार्च रोजी बांगलादेश संघाविरूद्ध होणार आहे. त्याचप्रमाणे श्रीलंका आणि विंडीज यांच्यातील सामना 6 मार्चला खेळविला जाईल. अलिकडे भारतात रस्त्यावरील वाहतुकीचा वेग वाढत असल्याने पादचाऱयांना वाहतुकीचे नियम पाळणे जरूरीचे आहे. रस्त्यावरून जाताना पादचाऱयांना भीतीपासून दूर करण्यासाठी रोड सेफ्टी विश्व क्रिकेट मालिका आयोजित केली आहे. या मालिकेमध्ये विविध देशांचे माजी अव्वल क्रिकेटपटू सहभागी होत आहेत. भारतीय संघामध्ये युवराज सिंग, युसूफ पठाण, नमन ओझा, आर. विनयकुमार यांचा समावेश आहे. गेल्यावर्षी पहिल्यांदा आयोजित केलेली रोड सेफ्टी विश्व क्रिकेट मालिका कोरोना समस्येमुळे केवळ चार सामन्यानंतर रद्द करावी लागली होती.
- भारतीय संघ- तेंडुलकर, सेहवाग, युवराज सिंग, कैफ, प्रग्यान ओझा, नोयेल डेव्हिड, मुनाफ पटेल, इरफान पठाण, मनप्रित गोनी, युसूफ पठाण, नमन ओझा, भंद्रीनाथ, आर. विनयकुमार.
- श्रीलंका संघ- दिलशान, सनथ जयसूर्या, महारूफ, रंगण्णा हेराथ, टी. तुषारा, अजंता मेंडीस, केपुगेद्रा, थरंगा, चमारा सिल्वा, सी. जयसिंघे, धमिका प्रसाद, कुलशेखरा, अर्नोंल्ड, विजेसिंघे आणि वर्णपुरा.
- विंडीज संघ- लारा, बेस्ट, जेकॉब्ज, देवनरेन, सुलेमान बेन, रामनरेन, सॅनफोर्ड, कार्ल हुपर, ड्वेन स्मिथ, ऑस्टीन, पर्किन्स आणि नागामोटो.
- दक्षिण आफ्रिका संघ- जाँटी ऱहोड्स, व्हॅन वेक, क्रूजेर, टेलेमाचिस, केंप, ए पीटरसन, हेवर्ड, पुटिक, बोसमेन, डी ब्रुयेन, शेबालेला, झोडेंकी, लॉईड जोन्स आणि एन्टेनी.
- इंग्लंड संघ- केव्हिन पीटरसन, शहा, मस्टर्ड, माँटी पनेसर, क्रॉम्पटन, कबीर अली, साजिद मेहमूद, ट्रेडवेल, स्कोफिल्ड, ट्रॉट, साईडबॉथम, अफजल, होगार्ड आणि टीनडॉल, @बांगलादेश संघ- खलीद मेहमूद, नफिस इक्बाल, मोहम्मद रफीक, अब्दूर रझाक, खलीद मसूद, हेनान सरकार, जावेद ओमर,. सालेह, मेहराब हुसेन, अफताब अहमद, कबीर, मुस्ताफिजुर रेहमान आणि रशीद.