For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हॉटेल बूक करताय सावधान!

01:06 PM Jun 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
हॉटेल बूक करताय सावधान
Advertisement

पणजी : देशात सायबर गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. या सायबर गुन्हेगारीचे जाळे आता गोव्यातही सर्वदूर पसरल्याचे दिसत असून, सामान्य जनतेबरोबर आता राज्यातील मोठी मोठी हॉटेलही सायबर गुन्हेगारांकडून लक्ष्य केली जात असल्याची माहिती समोर आली आहे. गत 2023 या सालात एकूण 18 राज्यातील मोठ्या मोठ्या हॉटेलांचे फेक वेबसाईट सायबर गुन्हेगारांनी तयार करून गुगलवर या हॉटेलांमध्ये सवलतीच्या दरात रूम देत असल्याची चुकीची माहिती देऊन शेकडो ग्राहकांकडून पैसे उकळल्याचे समोर आहे. तर जानेवारी 2024 ते 15 जून 2024 या साडेपाच महिन्यांच्या कालावधीत 12 मोठ्या हॉटेलांना सायबर गुन्हेगारांकडून फटका बसलेला आहे. सायबर क्राईम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ज्या ग्राहकांनी हॉटेल बूक केली आहे, त्यांना रूम बूक झाल्याची पावतीही देण्यात आली. परंतु प्रत्यक्षात मात्र, हॉटेलवर ग्राहक आल्यानंतर आपली रूम बूक झाली नसल्याचे  हॉटेल प्रशासनाने सांगितल्याने ग्राहकाची फसवणूक झाल्याचे त्याला कळाले आहे. हा प्रकार म्हणजे ‘ऑनलाईन’ पद्धतीने हॉटेल बूक केल्यामुळे घडत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अशाप्रकारच्या गोष्टींना बळी पडू नये, यासाठी ग्राहकांनी सावध भूमिका घ्यावी, असे सायबर क्राईम विभागाकडून कळविण्यात आले आहे.

Advertisement

अलीकडच्या काळात सायबर फ्रॉडचा एक नवीन प्रकार अस्तित्वात आला आहे ज्यामध्ये फसवणूक करणारे निष्पाप लोकांना मौल्यवान भेटवस्तू पाठवून आणि त्यांच्या नावावर पार्सल बुक करून फसवतात. नंतर कराच्या नावाखाली धमकावून त्यांच्याकडून पैसे उकळले जात आहेत. याविषयीची तक्रारी सायबर क्राईम विभागामध्ये यापूर्वीच नोंद झालेल्या आहेत.  फसवणुकीचा हा प्रकार आजकाल खूप सामान्य होत चालला आहे जिथे फसवणूक करणारा पीडित व्यक्तीशी कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मैत्री करतो. नंतर वाढदिवस आणि वर्धापन दिनासारख्या कोणत्याही विशेष प्रसंगी मौल्यवान भेटवस्तू पाठवण्याच्या बहाण्याने फसवणूक करणारा फोन नंबर आणि पीडिताचा पत्ता यासारखे तपशील मिळवतो. काही दिवसांनी फसवणूक करणारा पीडितेला वॉट्सअॅप

कॉल करतो आणि कुरिअरद्वारे तिला पाठवलेल्या गिफ्टचा तपशील देतो. पण भेटवस्तू पीडित व्यक्तीला कधीच मिळत नाही पण त्यादरम्यान सीबीआय, कस्टम्स, इमिग्रेशन, पोलीस आणि इतर अशा विविध बनावट सुरक्षा संस्थांकडून धमकीचे कॉल येतात. या बनावट सरकारी एजन्सी पीडितेला धमकावतात की गिफ्ट स्कॅन केल्यानंतर त्यात बेकायदेशीर वस्तू आहेत ज्या कुरिअरद्वारे पाठवण्याची परवानगी नाही आणि त्यामुळे पीडितेला अटक होऊ शकते. तो फसवणूक करून पीडितांचे आधार कार्ड, एपिक कार्ड आणि बँक खात्यांचा तपशीलही घेऊ शकतो. म्हणून अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी लोकांनी सायबर क्राईम विभागाने केलेल्या सूचनांचे पालन करण्याची गरज आहे.

Advertisement

काही बनावट कुरिअर एजन्सीही कार्यरत आहेत. अशा बनावट कुरिअर एजन्सीकडून फसवणुकीचे कॉल लोकांना येत असल्याच्या तक्रारी आता पुढे येऊ लागल्या आहेत. एखाद्या व्यक्तीच्या किंवा पीडितेच्या नावावर पार्सल बुक केल्याची माहिती बनावट कुरिअर एजन्सीकडून दिली जात आहे. पीडितेची खरी ओळख पटण्यासाठी त्याला आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक खाती यासारखे पीडितांचे तपशील मिळतात. पीडितेला नंतर स्काईप प्लॅटफॉर्मवर विविध सुरक्षा संस्थांकडून कॉल येतो.याच तपशिलांचा वापर फसवणूक करणारे नंतर पीडितेला धमकावण्यासाठी करतात आणि समस्या सोडवण्याच्या बहाण्याने पीडितांकडून पैसे उकळतात यामध्ये  निरपराध पीडितेची फसवणूक होत असल्याची माहिती समोर येत असल्याने वेळीच लोकांनी सावधानता बाळगून आपली व्यक्तिगत माहिती कुणालाही देणे धोक्याचे ठरू शकते.

अॅडमिन महिलेकडून लोकांना चुकीची माहिती

राज्यातील विविध ठिकाणच्या शेकडो लोकांना व्हॉटसअप समूह गटाद्वारे ‘ऑनलाईन’ पद्धतीने फसवलेल्या ऊक्सार शेख नामक महिलेकडून चुकीची माहिती दिली जात आहे. कारण ऑनलाईन पद्धतीने हॉटेलची ऊम बूक केल्यास त्यावर आकर्षक सवलत तसेच अतिरिक्त पैसा मिळणार असल्याचे सांगण्यात आले होते. ऊक्सार शेख या महिलेवर विश्वास ठेवून उद्योजक, किराणा दुकानदार,फळ विक्रेते तसेच वकील यांनीही ऑनलाईन व्यवहारात पैसे गुंतवले होते. त्यांची फसगत झाल्याचे लक्षात आल्यानंतर या महिलेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता लोकांना ती नेमकी कोणत्या पत्यावर राहते याविषयी चुकीची माहिती महिला देत असल्याचे लोकांनी दै. ‘तऊण भारत’शी बोलताना सांगितले. शेकडो लोकांच्या ‘ऑनलाईन’ फसवुणकीचे वृत्त प्रसिद्ध होताच अनेक राज्यातील विविध भागातील लोकांनी आपल्या व्यथा मांडल्या.

फसवणूक न होण्यासाठी याकडे द्या विशेष लक्ष

  • फोननंबर, पत्ता, आधारकार्ड,पॅन कार्ड आणि बँक खाती यासारखे कोणतेही वैयक्तिक तपशील कोणत्याही अनोळखी व्यक्तीसोबत कधीही शेअर करू नका.
  • कोणत्याहीअनोळखीव्यक्तीसोबत वैयक्तिक छायाचित्रे, व्हिडिओ आणि बँक खात्याशी संबंधित ओटीपी शेअर करू नका.
  • अनोळखीव्यक्तींकडूनफ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नका आणि कोणत्याही ऑनलाइन समस्यांचे निराकरण करण्यासाठी व्हिडिओ किंवा ऑडिओ कॉलसाठी त्यांची विनंती स्वीकारू नका.
  • सायबरगुन्हेगारांकडूनअधिकारी असल्याचे भासवून अटक वॉरंट जारी झाल्यास घाबरू नका तर मदतीसाठी जवळच्या पोलीस स्टेशन आणि सायबर क्राइम सेलशी संपर्क साधा.
  • नेहमीलक्षातठेवा की सर्व कायदेशीर कार्यवाही प्रत्यक्ष पोस्टल मोडद्वारे किंवा स्थानिक पोलिसांद्वारे केली जाते आणि वॉट्सअॅपवर नाही.
  • तुम्हीबुकन केलेल्या पार्सलचे कोणतेही कर आणि शुल्क कधीही भरू नका.
  • कोणत्याहीआर्थिकफसवणुकीची तक्रार तत्काळ मदतीसाठी 1930 वर कॉल करून किंवा
  • www.cybercrime.gov.in वर लॉग इन करून किंवा सायबर क्राईम पोलीस ठाणे संपर्क क्र. 0832-2443201 किंवा 112 यावर संपर्क साधा.
Advertisement
Tags :

.