महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

हरमल येथील अपघातात दोन युवकांचा मृत्यू

06:32 AM Feb 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

दुचाकीची ट्रकला धडक, एक जागीच ठार तर दुसऱ्याचा उपाचारादरम्यान मृत्यू :

Advertisement

वार्ताहर / हरमल, पेडणे

Advertisement

हरमल मेथरवाडा येथे ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील दोन युवकांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. दुचाकी चालक साहील शंकर नाईक (वय18) रा. हरमल, आरोंदेकरवाडा हा युवक जागीच ठार झाला. तर त्याच्या मागे बसलेला त्याचा चुलत भाऊ दीप दिलीप नाईक (वय 21) रा. हरमल, आरोंदेकरवाडा हा यात गंभीर जखमी झाला होता. त्याला बांबोळी येथे गोमेकॉत दाखल केले होते. मात्र उपचार सुरू असताना त्याचाही मृत्यू झाला. या अपघाताचे वृत पसरताच वाड्यावर शोककळा पसरली.

उपलब्ध माहितीनुसार, शनिवारी संध्या. 4 वाजण्याच्या सुमारास साहील व दीप हे दोघे स्कूटर क्र. जीए -11- एफ -1764 या गाडीने तिठ्यावरून घरी जात होते. त्यावेळी मेथर वाड्यावरील एका हॉटेलनजीक थांबलेल्या स्विफ्ट कारचा दरवाजा अचानक उघडल्याने साहील याने दुचाकी वळवली व बाजू घेऊन पुढे जात असतानाच समोरून येणाऱ्या क्र. जीए-02-यू-8828 ट्रकला दुचाकीची धडक बसली. त्यात साहील नाईक व दीप नाईक हे गंभीर जखमी झाले. दोघांनाही रुग्गवाहिकेतून इस्पितळात उपचारासाठी नेले मात्र त्याठिकाणी साहील याला मृत झाल्याचे घोषित केले. तर दीप याला तातडीने उपचारासाठी गोमकॉत दाखल केले.

दरम्यान, दरवाजा उघडलेली स्विफ्ट कार क्र, जीए 07 एफ 8139 ही वास्को येथील असून सदर कार अपघातानंतर घटनास्थळवरून पसार झाली. या वाहनाचा ग्रामस्थांनी शोध घेण्यास सुरुवात केली. दरम्यान, सदर कार मांद्रे येथे एका युवकाने पाहिली व ग्रामस्थांना कळविले. हे पोलिसांना समजल्यानंतर पोलिसांनी संबधित कार ताब्यात घेतली. ट्रक चालक मात्र तिथेच थांबला होता.

मांद्रे पोलीस स्थानकाचे निरीक्षक शरीफ यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व अधिक तपास चालू आहे. दरम्यान, अपघाताच्या घटनेनंतर स्थानिक संतप्त झाले. स्विफ्ट कार व ट्रक चालकांना ताब्यात घेऊन कारवाई करण्याची मागणी केली.

साहील हा उत्कृष्ट तबलापटू होता व अनेक संगीत कार्यक्रमात भाग घेत होता. अलीकडे संगीत संमेलनात त्यांनी तबला सोलो वादन केले होते.

दरम्यान, मयतांच्या आजीचे नुकतेच निधन झाले होते. तिच्या बाराव्या दिनीच ही दु:खद घटना घडली. दोन्ही चुलत भावांच्या अपघाती निधनामुळे गावात शोककळा पसरली आहे.

हरमलातील शिवजयंती उत्सव रद्द

अपघातात हरमल येथील दोन युवकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे हरमल परिसरातील सर्व शिवजंयती उत्सव रद्द करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article