कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

स्वायटेक, साबालेन्का उपांत्यपूर्व फेरीत, व्हेरेव्ह पराभूत

06:18 AM May 01, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ माद्रिद, स्पेन

Advertisement

खंडित झालेला वीजप्रवाह सुरळीतपणे सुरू झाल्यानंतर माद्रिद ओपन टेनिस स्पर्धेतील लांबणीवर टाकण्यात आलेले सामने पूर्ण करण्यात आले. द्वितीय मानांकित इगा स्वायटेकने उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले तर जर्मनीच्या अलेक्झांडर व्हेरेव्हला पराभवाचा धक्का बसला.

Advertisement

अग्रमानांकित एरीना साबालेन्कानेही शेवटच्या आठमध्ये स्थान मिळविताना पेटन स्टीम्सचा सरळ सेटमध्ये पराभव केला. पुरुष एकेरीत अग्रमानांकित व्हेरेव्हला 21 व्या मानांकित अर्जेन्टिनाच्या फ्रान्सिस्को सेरुन्डोलोने 7-5, 6-3 असा पराभवाचा धक्का दिला. गेल्या वर्षीही सेरुन्डोलोने व्हेरेव्हला हरविले होते. स्वायटेकने डायना श्नायडरचा 6-0, 6-7 (3-7), 6-4 असा पराभव केला. तिची उपांत्यपूर्व लढत मॅडिसन कीजशी होईल. कीजने डोने व्हेकिचचा 6-2, 6-3 असा धुव्वा उडविला. ऑस्टेलियन ओपनमधील उपांत्य फेरीत स्वायटेक व कीज यांच्यात शेवटची लढत झाली होती. त्यात कीजने बाजी मारत नंतर जेतेपदही पटकावल होते. साबालेन्काने स्टीम्सवर 6-2, 6-4 अशी मात केली.

इटलीच्या मॅटेव बेरेटिनीने पोटदुखीमुळे स्पर्धेतून माघार घेतली. सहाव्या मानांकित जॅक ड्रेपरविरुद्ध त्याने पहिला सेट 7-6 (7-2) असा गमविला होता. सहाव्या मानांकित अॅलेक्स डी मिनॉरने कॅनडाच्या डेनिस शॅपोव्हॅलोव्हचा 6-3, 7-6 (7-3) असा पराभव केला. त्याची पुढील लढत लॉरेन्झो मुसेटीशी होईल. मुसेटीने ग्रीसच्या स्टेफानोस सित्सिपसवर 7-5, 7-6 (7-3) अशी मात केली. अमेरिकेच्या टॉमी पॉल व फ्रान्सेस टायफो यांनीही विजय मिळवित आगेकूच केली. पॉलने कॅरेन खचानोव्हवर 6-3, 3-6, 6-2, टायफोने अलेक्झांडर म्युलरवर 6-3, 6-3 अशी मात केली. नवव्या मानांकित डॅनील मेदवेदेव्हने पहिल्यांदाच या स्पर्धेत शेवटच्या आठ फेरीत स्थान मिळविताना अमेरिकेच्या ब्रँडन नाकाशिमाला 3-6, 6-1, 6-4 असे नमविले तर कॅस्पर रुडने चौथ्या मानांकित टेलर फ्रिट्झचे आव्हान 7-5, 6-4 असे संपुष्टात आणले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article