स्वायटेक, कास्पर रूड उपांत्य फेरीत

मियामी : एटीपी आणि डब्ल्यूटीए टूरवरील येथे सुरू असलेल्या मियामी खुल्या पुरूष आणि महिलांच्या टेनिस स्पर्धेत पोलंडच्या द्वितीय मानांकित इगा स्वायटेकने तसेच पुरूष विभागात नॉर्वेच्या कास्पर रूडने एकेरीची उपांत्य फेरी गाठली.
महिला एकेरीच्या खेळविण्यात आलेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात स्वायटेकने झेकच्या क्विटोव्हाचा 6-3, 6-3 अशा सरळ सेट्समध्ये पराभव करत शेवटच्या चार खेळाडूंत स्थान मिळविले. 20 वर्षीय स्वायटेकचा एकेरीतील हा सलग 15 वा विजय असून 2022 च्या टेनिस हंगामामध्ये डब्ल्युटीए टूरवरील स्पर्धेत पाचव्यांदा उपांत्य फेरी गाठली आहे. अमेरिकेच्या जेसीका पेगुलाने या स्पर्धेत उपांत्य फेरी गाठली. उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात तिची प्रतिस्पर्धी बेडोसा प्रकृती बिघडल्यामुळे शेवटपर्यंत खेळू शकली नाही. तिने हा सामना पहिल्याच सेटमध्ये अर्धवट सोडल्याने पेगुलाने उपांत्य फेरी गाठली.