सेन्सेक्स 61,873 च्या नव्या उंचीवर झेपावला
जागतिक स्थितीचा बाजाराला फायदा : निफ्टीही 18,400 वर
वृत्तसंस्था /मुंबई
विदेशी गुंतवणूकदारांनी केलेल्या लिलावामुळे व जागतिक पातळीवरील बाजारांमधील मजबूत स्थितीमुळे भारतीय भांडवली बाजारामध्ये चालू आठवडय़ातील दुसऱया दिवशी मंगळवारच्या सत्रात तेजी राहिली होती. सेन्सेक्सने 61,800 चा नवा विक्रमी टप्पा प्राप्त केला आहे.
दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 248.84 अंकांनी वधारुन 0.40 टक्क्यांसोबत निर्देशांक 61,872.99 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा 74.25 अंकांसोबत निर्देशांक 18,403.40 वर बंद झाला आहे. 11 नोव्हेंबर रोजी सेन्सेक्सने आपला मागील विक्रम मोडीत काढत 61,795.04 अंकांचा टप्पा प्राप्त केल्याचे दिसून आले होते. त्यानंतर आता पुन्हा वरचा टप्पा सेन्सेक्सने गाठल्याचे दिसून आले.
सेन्सेक्समध्ये पॉवरग्रिड, आयसीआयसीआय बँक, भारती एअरटेल, अल्ट्राटेक सिमेंट, भारतीय स्टेट बँक, डॉ.रेड्डुाrज लॅब आणि एशियन पेन्ट्स यांचे समभाग प्रामुख्याने लाभात राहिले होते. अन्य कंपन्यांमध्ये आयटीसी, रिलायन्स इंडस्ट्रीज, बजाज फिनसर्व्ह आणि नेस्ले यांचे समभाग घसरणीसोबत बंद झाल्याचे दिसून आले.
आशियातील अन्य बाजारांमध्ये दक्षिण कोरियाचा कोस्पी, जपानचा निक्की, चीनचा शांघाय कम्पोझिट आणि हाँगकाँगचा हँगसेंग लाभासोबत बंद झाले आहेत. युरोपमधील प्रमुख बाजारात सुरुवातीला तेजीचा कल राहिला होता. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल 1.62. टक्क्यांसोबतच्या तेजीसह 91.63 डॉलर प्रति बॅरेलवर पोहोचले आहे.
मंगळवारच्या सत्रातील कामगिरीमुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्साह वाढला असून आगामी काळात या गोष्टीचा सकारात्मक परिणाम राहिल्यास भारतीय शेअर बाजार आणखी एका नव्या विक्रमाची नोंद करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आजच्या कामगिरीने गुंतवणूकदारांच्या आशा पल्लवीत झाल्याचेही अभ्यासकांनी मत नोंदवले आहे.
समभाग वधारलेल्या कंपन्या
- पॉवरग्रिड कॉर्प.... 215
- आयसीआयसीआय 912
- भारती एअरटेल... 835
- अल्ट्राटेक सिमेंट. 6961
- स्टेट बँक............. 600
- डॉ.रेड्डीज लॅब.... 4427
- टायटन............ 2661
- महिंद्रा ऍण्ड महिंद्रा 1291
- एशियन पेन्ट्स.. 3081
- ऍक्सिस बँक........ 858
- इन्फोसिस........ 1593
- एचडीएफसी..... 2674
- एचसीएल टेक... 1103
- एनटीपीसी......... 171
- एचडीएफसी बँक 1619
- इंडसइंड बँक..... 1155
- विप्रो............. 39715
- बजाज फायनान्स 7033
- टेक महिंद्रा....... 1066
- मारुती सुझुकी... 9159
- ओएनजीसी........ 142
- गेल..................... 89
- एसीसी............ 2477
- सीजी कंझ्युमर..... 367
- अंबुजा सिमेंट...... 586
- अपोलो हॉस्पिटल 4609
- एसबीआय लाईफ 1259
- बजाज ऑटो...... 3759
- ब्रिटानिया........ 4139
समभाग घसरलेल्या कंपन्या
- बजाज फिनसर्व्ह 1705
- आयटीसी........... 345
- रिलायन्स इंडस्ट्रीज 2606
- सनफार्मा......... 1013
- नेस्ले.............. 20027
- टाटा स्टील......... 108
- कोटक महिंद्रा.... 1920
- आयटीसी......... 3332
- हिंदुस्थान युनि.. 2456
- आयआरसीटीसी.. 740
- सिमेन्स............ 2850
- अशोक लेलँड 150