For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सिसोदियांची पुन्हा जामिनासाठी याचिका

06:33 AM Apr 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
सिसोदियांची पुन्हा  जामिनासाठी याचिका
Advertisement

प्रचाराचे कारण केले पुढे : 20 एप्रिलला सुनावणी

Advertisement

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी अंतरिम जामिनासाठी पुन्हा न्यायालयात धाव घेतली आहे. दिल्ली मद्य घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आलेल्या मनीष सिसोदिया यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अंतरिम जामीन मागितला आहे. राऊस अॅव्हेन्यू न्यायालयात शुक्रवारी त्यांच्या याचिकेवर सुनावणी झाली. सुनावणीअंती न्यायालयाने सीबीआय आणि ईडीला उत्तर दाखल करण्यासाठी एका आठवड्याची मुदत दिली आहे. आता सिसोदिया यांच्या अंतरिम जामीन अर्जावर 20 एप्रिलला सुनावणी होणार आहे.

Advertisement

मनीष सिसोदिया यांनी अलीकडेच आपल्या नातेवाईकाच्या लग्न समारंभाला उपस्थित राहण्यासाठी जामीन मागितल्यानंतर तो मान्य करण्यात आला होता. आता पुन्हा एकदा त्यांनी अंतरिम जामिनाची मागणी केली आहे. मनीष सिसोदिया यांनी आपल्या भाचीच्या लग्नाला उपस्थित राहण्यासाठी अंतरिम जामिनाची मागणी करणारा अर्ज राऊस अॅव्हेन्यू न्यायालयात दाखल केला होता. मनीष सिसोदिया आणि तपास यंत्रणांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आपचे ज्येष्ठ नेते मनीष सिसोदिया यांना तीन दिवसांचा जामीन मंजूर केला होता. तत्कालीन विशेष न्यायाधीश एम. नागपाल यांनी मनीष सिसोदिया यांना 2 लाख ऊपयांचा वैयक्तिक बाँड आणि तेवढीच रक्कम जामीन म्हणून जमा करण्याचे आदेश दिले होते. मनीष सिसोदिया यांना गेल्यावर्षी 26 फेब्रुवारीला अटक करण्यात आली होती. तेव्हापासून ते तुऊंगात आहेत. मात्र, याचदरम्यान त्यांनी अनेक कारणांवरून केलेली जामिनाची मागणी न्यायालयाने फेटाळली होती.

Advertisement
Tags :

.