साबालेन्का, पेसिकोव्हा यांचे आव्हान समाप्त
दुबई : डब्ल्यूटीए टूरवरील येथे सुरू असलेल्या दुबई खुल्या महिलांच्या टेनिस स्पर्धेत बेलारुसची साबालेन्का आणि बार्बोरा पेसिकोव्हा यांचे एकेरीतील आव्हान दुसऱया फेरीतच समाप्त झाले.
झेक प्रजासत्ताकच्या पेत्रा क्विटोव्हाने बुधवारी येथे खेळविण्यात आलेल्या दुसऱया फेरीतील सामन्यात बेलारुसच्या द्वितीय मानांकित साबालेन्कावर 6-4, 6-4 अशी मात करत पुढील फेरीत स्थान मिळविले. क्विटोव्हा या स्पर्धेतील माजी विजेती आहे. दुसऱया फेरीतील अन्य एका सामन्यात युपेनच्या यास्टेमस्काने प्रेंच ग्रॅण्डस्लॅम विजेती पेसिकोव्हावर 6-3, 7-6 (7-3) अशी मात केली. रशियाच्या कुडरमेटोव्हाने या स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठताना स्पेनच्या मुगुरुझाचे आव्हान 3-6, 6-4, 6-4 असे संपुष्टात आणले. लॅटिव्हियाच्या ओस्टापेंकोने स्वायटेकवर 4-6, 6-1, 7-6 (7-4) तसेच स्वीटोलिनाने स्वीसच्या टिचमनवर 7-6 (7-0), 6-2 अशी मात करत पुढील फेरीत स्थान मिळविले. 2013 साली क्विटोव्हाने या स्पर्धेचे विजेतेपद मिळविले होते.