साकेत-रामकुमार उपांत्यपूर्व फेरीत
06:30 AM Feb 18, 2022 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
बेंगळूर : येथे सुरू असलेल्या एटीपी टूरवरील बेंगळूर खुल्या पुरुषांच्या टेनिस स्पर्धेत बुधवारी भारताच्या साकेत मायनेनी आणि रामकुमार रामनाथन यांनी दुहेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठताना आपल्याच देशाच्या युकी भांब्री आणि डी. शरण यांचा सरळ सेट्समध्ये पराभव केला.
Advertisement
गेल्या आठवडय़ात मायनेनी साकेत आणि रामकुमार यांनी येथे झालेल्या बेंगळूर खुल्या टेनिस स्पर्धेत दुहेरीचे जेतेपद पटकाविले होते. बेंगळूर खुल्या 2 एटीपी चॅलेंजर टेनिस स्पर्धेतील दुहेरीच्या सामन्यात साकेत आणि रामकुमार यांनी भांब्री व डी. शरण यांचा 6-1, 7-5 असा पराभव केला. दुसऱया एका सामन्यात वाईल्ड कार्डधारक प्रज्ज्वल देव आणि निकी कालियांदा पुनाच्या या जोडीने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविताना कॅनडाचा डायझ आणि जपानचा नोगुची यांच्यावर 6-2, 6-4 अशी मात केली.
Advertisement
Advertisement