सरकारचा 8 लाख टन अतिरिक्त साखर निर्यातीचा आदेश
खाद्य मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱयांची माहिती
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
सरकारकडून आता 1 ऑगस्टपासून 8.2 लाख टन अतिरिक्त साखर निर्यात करण्यासाठीचा आदेश जारी केला आहे. यातील मुख्य 2.2 लाख टन साखर निर्यातीसाठीचा आदेश चालू आठवडय़ाच्या शेवटी सादर केला जाणार असल्याची माहिती खाद्य मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱयांनी दिली आहे.
सरकारने साखरेची स्थानिक उपलब्धता वाढविणे आणि उच्चांकी किमतींना नियंत्रणात आणण्यासाठी 1 जूनपासून 100 लाख टनापेक्षा अधिकची साखर निर्यात करण्यावर प्रतिबंध लागू केला होता.
साधारणपणे अधिक उत्पादन आणि देशातील बाजारात साखरेच्या मागणीतील नरमाईचा कर राहिल्याने साखर साठय़ामध्ये सुधारणा आल्याने सरकारला या निर्णयाचा पुनर्विचार करावा लागला आहे. यामुळे 1 ऑगस्टपासून 12 लाख टन अतिरिक्त साखर निर्यातीला मान्यता देण्यात आली आहे.
यामधील जवळपास 101.6 लाख टन साखर निर्यात अगोदरच झाली आहे. 8.2 लाख टन अतिरिक्त साखर निर्यातीचा आदेश अगोदरच सादर करण्यात आला आहे. मात्र चालू सप्ताहाच्या शेवटी हा आदेश सादर होणार असल्याची माहिती आहे.
अन्य बाबी.....
- सप्टेंबरमध्ये समाप्त होणाऱया 2021-22 च्या सत्रात आतापर्यंत साखर उत्पादन 356 लाख टनाच्या घरात पोहोचले.
- चालू वर्षात एकूण साखर उत्पादन जवळपास 360 लाख टन होणार असल्याचे संकेत
- ज्यामध्ये 2021-22 च्या सत्रात 322 लाख टन साखर उत्पादनापेक्षा अधिक आहे
- निर्यात प्रतिबंधांमध्ये सवलत दिल्यानंतर 60 लाख टन शिल्लक साठा राहणार