For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सरकारकडून ठोस कारवाई न झाल्यास न्यायालयात जाऊ

12:33 PM Sep 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
सरकारकडून ठोस कारवाई न झाल्यास न्यायालयात जाऊ
Advertisement

कारकून भरतीप्रकरणी गोवा फॉरवर्डचा इशारा  ‘चिंटू-पिंटू’ व ‘लेडी डॉन’ गुंतल्याचा दावा

Advertisement

मडगाव : दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयातील कनिष्ठ कारकून भरती घोटाळाप्रकरणी कारवाईची मागणी गोवा फॉरवर्डने पुन्हा उचलून धरली आहे. गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई या प्रकरणी मुख्य सचिवांना पत्र पाठवणार आहेत. ठोस पावले उचलली नाहीत, तर हा प्रश्न आम्ही न्यायालयात नेऊ. यासंदर्भात आपले आश्वासन मुख्यमंत्री पूर्ण करतील आणि सखोल चौकशी सुरू करतील अशी आम्हाला आशा आहे, असे गोवा फॉरवर्डचे सरचिटणीस दुर्गादास कामत यांनी म्हटले आहे. काही दिवसांपूर्वी आमचे नेते विजय सरदेसाई यांनी सदर घोटाळा उघडकीस आणला होता. यासंदर्भात महसूलमंत्र्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही प्रतिसाद मिळाला नव्हता.  सरदेसाई यांनी मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आश्वासन दिले होते. तथापि सरकारच्या प्रतिसादाची वाट पाहत असताना आम्ही स्वत: तपासणी केली असता धक्कादायक तपशील उघड झालेला आहे, असा दावा कामत यांनी केला आहे.

कनिष्ठ कारकून भरती प्रक्रियेसाठी मुलाखतीच्या निकालांमध्ये फेरफार हा परीक्षा आयोजित करण्यासाठी जबाबदार असलेल्या एजन्सीद्वारे म्हणजे डिचोली पॉलिटेक्निकने केला गेला असल्याचे समोर आले आहे. या घोटाळ्यात चिंटू आणि पिंटू या नावाने ओळखले जाणारे दोन अधिकारी तसेच ज्यांना ‘दि लेडी डॉन’ म्हणून संबोधले जाते असे एक शक्तिशाली व्यक्तिमत्त्व गुंतलेले आहे. या व्यक्ती उमेदवारांशी संपर्क साधत होत्या अशी माहिती आम्हाला मिळाली आहे, मात्र त्याची पुष्टी होऊ शकलेली नाही, असा दावा कामत यांनी केला आहे. आम्ही असेही ऐकले आहे की, चिंटू व पिंटू हे अधिकारी आता संरक्षण मिळावे यासाठी प्रयत्न करत आहेत. ‘लेबर गेट’ आणि कला अकादमी घोटाळा याप्रमाणे या प्रकरणातही एलडीसी मुलाखत प्रक्रियेस प्रामाणिकपणे हजर झालेल्या 13,000 तऊणांना न्याय मिळेपर्यंत आम्ही अथक पाठपुरावा करू. असे कामत यांनी स्पष्ट केले आहे.

Advertisement

हज समिती अध्यक्षांचे आरोप बिनबुडाचे

हज समितीच्या अध्यक्षांनी नुकतेच केलेले आरोप हे बिनबुडाचे आहेत. एका व्हिडीओमध्ये महसूलमंत्री बाबुश मोन्सेरात यांचा बचाव करताना त्यांनी विजय सरदेसाई यांच्यावर आरोप केला आहे की, 2012 पूर्वी जमिनीचे ऊपांतर करण्यासाठी तत्कालीन नगरनियोजनमंत्री असलेल्या मोन्सेरात यांच्याशी त्यांनी संपर्क साधला होता. हा खोटा आरोप आम्ही स्पष्टपणे नाकारतो. सरदेसाई व त्यांच्या कुटुंबाने गरीब लोकांना आणि सार्वजनिक प्रकल्पांसाठी गोवा सरकारला स्वत:च्या जमिनी दिलेल्या आहेत, असे कामत यांनी म्हटले आहे. हज समितीच्या अध्यक्षांनी स्वत:च्या कृतींचा विचार केला पाहिजे. त्यात बेकायदेशीर गोष्टींपासून वैयक्तिक संरक्षणासाठी पक्ष बदलणे, शिक्षक भरती, शाळा चालवण्यासाठी शिक्षण विभागाची दिशाभूल करणे आणि बेकायदेशीर टेकडी तोडणे यांचा समावेश होतो, असा प्रत्यारोप कामत यांनी केला आहे. टेकडी तोडण्याच्या प्रकरणात काम थांबवण्याची नोटीसही जारी केली गेली होती, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. 13000 पात्र तऊणांसाठी उभे राहिलेले विजय सरदेसाई यांना लक्ष्य करत राहिल्यास त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील. आमच्या नेत्यावर निराधार हल्ले करण्यापूर्वी दोनदा विचार करावा, असा इशारा कामत यांनी दिला आहे.

Advertisement
Tags :

.