For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

संजनाला वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्ण, सायली वाणीला टेटेमध्ये ‘डबल’

06:26 AM Jan 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
संजनाला वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्ण  सायली वाणीला टेटेमध्ये ‘डबल’
Advertisement

वृत्तसंस्था : / चेन्नई

Advertisement

येथे सुरू असलेल्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत हरियाणाची महिला वेटलिफ्टर संजनाने 76 किलो वजन गटात सुवर्णपदक मिळवित आपल्या कामगिरीत लक्षणीय सुधारणा केली. त्याप्रमाणे महाराष्ट्राच्या सायली वाणीने टेबलटेनिस क्रीडा प्रकारात दुहेरी मुकुट साधला.

महिलांच्या वेटलिफ्टींग प्रकारातील 76 किलो वजन गटात संजनाने क्लिनमध्ये 113 तर जर्कमध्ये 116 किलो वजन उचलत नवा राष्ट्रीय विक्रम नोंदविला. या क्रीडा प्रकारात महाराष्ट्राच्या ग्रीश्मा थोरातने एकूण 167 किलो वजन उचलत रौप्यपदक तर उत्तरप्रदेशच्या पर्व चौधरीने मुलांच्या 96 किलो वजन गटात एकूण 160 किलो वजन उचलत सुवर्णपदक पटकाविले. आंध्रप्रदेशच्या अरूणेश बाबुने रौप्य तर हरियाणाच्या आदीत्यने कास्यपदक पटकाविले.

Advertisement

टेबल टेनिस या क्रीडाप्रकारात महाराष्ट्राच्या सायली वाणीने दुहेरी मुकूट साधला. नाशिकच्या सायलीने एकेरीच्या सामन्यात पश्चिम बंगालच्या नंदीनी सहाचा 8-11, 8-11, 6-11, 11-8, 11-6, 11-0, 11-6 असा पराभव करत सुवर्णपदक पटकाविले. पश्चिम बंगालच्या नंदीनीने रौप्य तर महाराष्ट्राच्या प्रिता वर्तीकरने कास्यपदक घेतले. सायली वाणी आणि प्रिता वर्तीकर यानी मुलींच्या दुहेरीतील सुवर्णपदक मिळविताना अंतिम सामन्यात तनिषा कोटेचा व रिशा मिरचंदानी यांचा 3-11, 11-7, 11-9, 11-6 असा पराभव केला.

या स्पर्धेत महाराष्ट्राने पदक तक्मत्यात आघाडीचे स्थान मिळविले. सोमवारी महाराष्ट्राच्या जलतरणपटूंनी 4 सुवर्णपदकाची कमाई केली. महाराष्ट्राच्या रिशभ दासने 3 सुवर्णपदकाची कमाई केली. महाराष्ट्राच्या रूजुता राजाज्ञे सुवर्णपदक घेतले. कर्नाटकाच्या आरूशी अगरवालने रौप्यपदक मिळविले. महाराष्ट्राने या स्पर्धेत आतापर्यंत 44 सुवर्ण, 39, रौप्य आणि 44 कास्यपदकांसह प्रथम स्थान मिळविले असून या स्पर्धेतील दोन दिवस बाकी आहेत.

Advertisement
Tags :

.