शिंगरी-किंजळेचे तत्कालीन ग्रामसेवक अपहारप्रकरणी अटकेत
01:00 AM Jul 21, 2022 IST
|
Abhijeet Khandekar
Advertisement
खेड/प्रतिनिधी
Advertisement
तालुक्यातील शिंगरी व किंजळे तर्फे नातू या ग्रुप ग्रामपंचायतीसाठी प्राप्त झालेल्या २८ लाख ७ हजार ३७३ रुपयांच्या शासकीय निधीचा अपहार केल्याप्रकरणी तत्कालीन ग्रामसेवक पोपट कुसुम भोरजे यांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता २१ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
Advertisement
या अपहार प्रकरणी ग्रामविस्तार अधिकारी शरद साहेबराव भांड यांनी येथील पोलीस स्थानकात तक्रार दिली होती. २०१५ ते २०१७ या कालावधीत प्राप्त झालेल्या २८ लाख ७ हजार ३७३ रुपयांच्या शासकीय निधीचा वापर गावच्या विकासासाठी न करता स्वतः च्या फायद्यासाठी केल्याचे निष्पन्न झाल्याने तत्कालीन ग्रामसेवक भोरजे यांना अटक करण्यात आली आहे. याबाबतचा अधिक तपास पोलीस निरीक्षक निशा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हर्षद हिंगे करत आहेत.
Advertisement
Next Article