शासनाचे धान्य प्रत्येक कुटुंबाला मिळाले पाहिजे
प्रतिनिधी/ सातारा
कोरोनामुळे संपूर्ण देशातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. सर्वत्र
लॉक डाऊन असल्याने गोर- गरीब लोकांचे जगणे मुश्किल झाले आहे. सरकारने लॉक डाऊन काळात
जनतेला दिलासा देण्यासाठी रेशनींगवर मोफत तांदूळ व इतर धान्य देण्याचा निर्णय घेतला
आहे. जिह्यातील प्रत्येक कुटुंबाला हे धान्य मिळाले पाहिजे. बारकोड मधील त्रुटी अथवा
रेशन कार्ड नाही अशांनाही धान्य देऊन लॉक डाऊन काळात त्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी
आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे केली
असून याबाबत सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन जिल्हाधिकायांनी दिले.
आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नुकतीच
जिल्हाधिकारी सिंह यांची भेट घेतली. जिल्हा प्रशासनाकडून सुरु असलेल्या उपाययोजनांबाबत
त्यांनी आढावा घेतला. तसेच जिल्हाधिकारी यांना अजिंक्यतारा साखर कारखान्याने उत्पादित
केलेले हॅन्ड सॅनिटायझर भेट दिले. लॉक डाऊनमुळे
गोर गरीब लोकांना आणि ग्रामीण भागात अन्नधान्य तुटवडा होऊ नये यासाठी सरकारमार्फत रेशनवर
लोकांना मोफत धान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच सद्यस्थितीला अल्प दरात
रेशनवर धान्य दिले जात आहे. याचा लाभ प्रत्येक कुटुंबाला मिळाला पाहिजे. बारकोड संबंधित
त्रुटींमुळे काही लोकांना रेशन धान्य मिळत नाही. सध्याच्या परिस्थितीत कोणताही निकष
न लावता सर्वानांच अगदी रेशन कार्ड नसणाया गरजू लोकांनाही धान्य दिले जावे.
याशिवाय कोरोनामुळे पुणे, मुंबई आदी ठिकाणाहून अनेक कुटुंबे
त्यांच्या मूळ गावी आली आहेत. त्यांचे रेशन कार्ड पुणे अथवा मुंबईमधील आहे. मात्र काळाची
गरज ओळखून अशा लोकांनाही धान्य देऊन त्यांनाही दिलासा द्यावा, अशी मागणी आ. शिवेंद्रसिंहराजे
यांनी जिल्हाधिकायांकडे केली. याबाबत सकारात्मक निर्णय घेऊन शासनाचे धान्य प्रत्येक
कुटुंबापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करू, असे जिल्हाधिकारी सिंह म्हणाले.