शहरातील अडगळीतल्या जागा होणार विकसित
पालिकेने काढली स्वारस्य फेरनिविदा,दानशुर व्यक्ती, संस्थांना आवाहन
प्रतिनिधी /सातारा
शहरामध्ये अनेक पालिकेच्या जागा अशा अडगळीत आहेत. त्या जागेचा वापर होत नसल्याने त्या जागा विकसित करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने पालिकेने 15 जागा विकसित करण्यासाठी फेर स्वारस्य निविदा काढण्यात आलेल्या आहेत. हे काम झाल्यानंतर शहराला वेगळाच लूक येणार आहे.
सातारा शहरात रस्तोरस्ती अनेक ठिकाणी अडगळीतल्या जागा शिल्लक आहेत. त्या जागांमध्ये बेवारस वाहने उभी असतात तर काही ठिकाणी विद्युत पोल उभे असतात. याच जागांचा वापर शहराच्या सौंदर्याकरता करण्याच्या दृष्टीने पालिकेने ज्या सामाजिक संस्था, दानशूर व्यक्तीकडून या जागांचा विकास करण्याचे प्रयोजन असेल त्यांना या जागा विकासनकरता देण्यात येणार आहे. त्याकरता पालिकेने फेरस्वारस्य निविदा काढण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये शहरातील 15 जागा काढण्यात आलेल्या आहेत.
यापूर्वी पालिकेने काही ठिकाणी असा प्रयोग राबवण्यात आलेला आहे त्यास मंजुरी दिलेली आहे. पोवई नाक्यावर जेथे डिपी होता तेथे बटरफ्लाय पॉईंट करण्यात आलेला आहे. तसेच समर्थ मंदिर परिसरात असलेल्या देवेज्ञ मंगल कार्यालय परिसरातल्या मोकळय़ा जागेत असा पॉईंट विकसित होणार आहे. महादरे तलावाच्या परिसरात वॉकिंग ट्रक होणार आहे. त्याबाबत मुख्याधिकारी अभिजित बापट यांना विचारणा केली असता पालिकेच्या माध्यमातून अशा मोकळया जागा विकसित करुन सौदर्यात भर करण्याचा विचार आहे. दानशुर मंडळी वा संस्था पुढे येवून हे काम करत आहेत. चांगला सातारा होत आहे, असे त्यांनी सांगितले.