For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वेस्ट इंडिजची गाठ आज पापुआ न्यू गिनीशी

06:58 AM Jun 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
वेस्ट इंडिजची गाठ आज पापुआ न्यू गिनीशी
Advertisement

` वृत्तसंस्था/ जॉर्जटाऊन

Advertisement

`ईडन गार्डन्सवर कार्लोस ब्रॅथवेटच्या चार षटकारांनी दुसरे टी-20 विश्वविजेतेपद मिळवून दिल्यानंतर आठ वर्षांहून अधिक काळाने वेस्ट इंडिजचा संघ पुन्हा टी-20 विश्वचषकात उतरत असून आज रविवारी पापुआ न्यू गिनीविऊद्धच्या घरच्या मैदानावरील लढतीने ते स्पर्धेच्या नवव्या आवृत्तीतील मोहिमेची सुऊवात करतील.

ब्रॅथवेटने शेवटच्या षटकात बेन स्टोक्सला सलग चार षटकार खेचून वेस्ट इंडिजला दोनदा टी-20 विश्वचषक जिंकणारा पहिला संघ बनवले होते. त्यांचा पहिला विजय 2012 मध्ये नोंदला गेला होता. पण त्यानंतर संघ संक्रमणात हरवला. 2021 मधील स्पर्धेत सुपर 12 मध्ये बाहेर पडताना पाच सामन्यांत त्यांना चार पराभव सहन करावे लागले. ऑस्ट्रेलियातील 2022 च्या आवृत्तीत तर त्यांची सर्वांत वाईट परिस्थिती झाली. तेव्हा ते स्कॉटलंड आणि आयर्लंडकडून झालेल्या धक्कादायक पराभवांनंतर मुख्य फेरीसाठी पात्र ठरू शकले नव्हते.

Advertisement

मात्र यावेळी स्पर्धा घरच्या मैदानावर होत असल्याने ते पुन्हा वर्चस्व गाजविण्यास उत्सुक असतील. त्यांचा दोन वेळा टी-20 विश्वचषक जिंकणारा कर्णधार डॅरेन सामी प्रशिक्षक म्हणून परतला आहे आणि रोव्हमन पॉवेलच्या नेतृत्वाखालील संघाने सराव सामन्यात ऑस्ट्रेलियावर विजय मिळवून आपला हेतू स्पष्ट केला आहे. पण त्या सामन्यासाठी संघातील केवळ नऊ खेळाडू उपलब्ध झालेले असल्याने ऑस्ट्रेलियाची बाजू कमकुवत झाली होती.

वेस्ट इंडिजसाठी निकोलस पूरन मधल्या फळीत महत्त्वाची भूमिका बजावेल. परंतु त्यांच्याकडे पॉवेल, आंद्रे रसेल, शिमरॉन हेटमायर, शेरफेन रदरफोर्ड आणि रोमारियो शेफर्डच्या रूपाने भरपूर फटकेबाज आहेत. त्यांनी दुखापतग्रस्त जेसन होल्डरच्या जागी डावखुरा वेगवान गोलंदाज ओबेद मॅकॉयला संधी दिली आहे. दुसरीकडे, असदुल्ला वाला याच्या नेतृत्वाखालील पापुआ न्यू गिनी संघाची 2021 नंतर टी-20 विश्वचषकात सहभागी होण्याची ही दुसरी खेप आहे.

सामन्याची वेळ : रात्री 8 वा. (भारतीय वेळेनुसार)

Advertisement
Tags :

.