For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वेंगुर्ले एस.टी.कामगार संघटना अध्यक्षपदी दामोदर प्रभूखानोलकर

05:05 AM Feb 17, 2021 IST | Abhijeet Khandekar
वेंगुर्ले एस टी कामगार संघटना अध्यक्षपदी दामोदर प्रभूखानोलकर
1.दामोदर प्रभू-खानोलकर 2. विठ्ठल जाधव
Advertisement

वार्ताहर / वेंगुर्ले:

Advertisement

एकमेव मान्यता प्राप्त महाराष्ट्र स्टेट टान्सपोर्ट कामगार संघटनेच्या राज्य परिवहन वेंगुर्ले आगार संघटनेच्या अध्यक्षपदी दामोदर प्रभूखानोलकर तर सचिवपदी विठ्ठल जाधव यांची निवड करण्यात आली आहे.

वेंगुर्ले आगाराच्या ठिकाणी मान्यताप्राप्त राज्य परिवहन महामंडळाच्या एस. टी. कामगार संघटनेच्या वेंगुर्ले आगार संघटना निवडीची सभा कणकवलीतील संघटनेचे  विभागीय अध्यक्ष सुरेंद्र मोरजकर यांच्या अध्यक्षतेखाली व कणकवलीतील संघटनेचे sसिंधुदुर्गचे सचिव विनय राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली.

Advertisement

 या सभेत वेंगुर्ले आगाराच्या सन 2021-22 या वर्षाच्या कालावधीसाठी नूतन कार्यकारिणी एकमताने निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी विजय चव्हाण, आंतोन फर्नांडिस, संतोष धुरी, ए. के. पालकर, कार्याध्यक्षपदी सचिन नाईक, सचिवपदी विठ्ठल जाधव, सहसचिवपदी विठोबा गावडे, सौ. सीमा मठकर, सोपान गवंडे, महेश रेडकर, संघटक सचिवपदी सौ. अर्चना कांबळी, प्रसिद्धी सचिवपदी विलास तोरसकर, खजिनदार समीर कांबळी, सल्लागारपदी चंद्रसेन वेंगुर्लेकर, विभागीय कार्यकारीणी सदस्य पी. एम. गावडे, एस. ए. कोरगांवकर, स्वप्नील रजपूत, सदस्यपदी अक्षय येसाजी, प्रकाश नार्वेकर, साईराम तुळसकर, वाय. एस. बोवलेकर, एन. पी. दाभोलकर, एस. बी. मुरमुरे, प्रदीप काकतकर, एस. एच. परब, एस. आर. शेळके यांचा समावेश आहे.

मान्यताप्राप्त एस. टी. कामगार संघटनेच्या वेंगुर्ले आगार संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झालेले दामोदर प्रभू-खानोलकर यांचे विभागीय अध्यक्ष सुरेंद्र मोरजकर, सिंधदुर्गचे सचिव विनय राणे तसेच वेंगुर्ले आगार व्यवस्थापक श्याम चव्हाण यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. th-cable

Advertisement
Tags :

.