For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘वुमन्स प्रीमियर लीग’च्या लिलावात काश्वी गौतम, वृंदा दिनेशचा डंका

06:45 AM Dec 10, 2023 IST | Tarun Bharat Portal
‘वुमन्स प्रीमियर लीग’च्या लिलावात काश्वी गौतम  वृंदा दिनेशचा डंका
Advertisement

दिल्ली कॅपिटल्सकडून ऑस्ट्रेलियन खेळाडू अॅनाबेल सदरलँड 2 कोटी रुपयांना करारबद्ध

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

पंजाबची वेगवान गोलंदाज काश्वी गौतम ही शनिवारी येथे झालेल्या ‘वुमन्स प्रीमियर लीग’च्या लिलावाचे मुख्य वैशिष्ट्या राहिले. गुजरात जायंट्सने 2 कोटी ऊपयांची बोली लावून तिला करारबद्ध केले. सदर 20 वर्षीय खेळाडूसाठीची आरंभ बोली 10 लाख रुपये होती. ‘वुमन प्रीमियर लीग’च्या दुसऱ्या आवृत्तीसाठी काश्वीला आपल्या संघात खेचण्यात गुजरात जायंट्स यशस्वी होण्यापूर्वी त्यांच्यासह यूपी वॉरियर्सनेही तिच्याकरिता बोली लावली होती.

Advertisement

तिच्याप्रमाणे भारतीय संघातर्फे अजून न खेळलेल्या आणखी एका महिला क्रिकेटपटूसाठी मोठी बोली लागली आणि त्यात यूपी वॉरियर्सने कर्नाटकची 22 वर्षीय फलंदाज वृंदा दिनेशसाठी 1.3 कोटी ऊपयांची बोली लावली. वृंदा आणि काश्वी या दोघीही अलीकडेच इंग्लंड ‘अ’विऊद्ध झालेल्या तीन सामन्यांच्या मालिकेत भारत ‘अ’ संघातर्फे खेळल्या होत्या.

सुऊवातीच्या टप्प्यात ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंसाठी सर्वाधिक बोली लागून अष्टपैलू अॅनाबेल सदरलँडला दिल्ली कॅपिटल्सने 2 कोटी ऊपयांना आणि फोबी लिचफिल्डला गुजरात जायंट्सने 1 कोटी ऊपयांना करारबद्ध केले. 22 वर्षीय सदरलँडला या वर्षी मार्चमध्ये झालेल्या ‘वुमन्स प्रीमियर लीग’च्या उद्घाटन आवृत्तीनंतर गुजरात जायंट्सने मोकळे केले होते. तिच्यासाठॅ गतविजेत्या मुंबई इंडियन्सनेही बोली लावली होती, परंतु नंतर त्यांनी माघार घेतली आणि अखेरीस ही खेळाडू कॅपिटल्सकडे गेली.

गुजरात जायंट्सने डावखुऱ्या 20 वर्षीय लिचफिल्डला आपल्या संघात खेचले आहे. तिने ऑस्ट्रेलियाच्या सर्व प्रकारांतील क्रिकेट संघांत पदार्पण केले आहे. तर दक्षिण आफ्रिकेची वेगवान गोलंदाज शबनिम इस्माईलला तिच्या आरंभ बोलीच्या तिप्पट म्हणजे 1.20 कोटी ऊपयांना मुंबई इंडियन्स संघाने सामील करून घेतले आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने लिलावाच्या आधीच्या टप्प्यात ऑस्ट्रेलियाच्या जॉर्जिया वेरहॅमला 40 लाख रुपयांना, इंग्लंडच्या केट क्रॉसला 30 लाख ऊपयांना आणि 37 वर्षीय भारतीय फिरकीपटू एकता बिश्तला तिच्या आरंभ बोलीच्या दुप्पट म्हणजे 60 लाख ऊपयांना करारबद्ध केले आहे.

Advertisement
Tags :

.