महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

विषाद्वारे करतात लोकांवर उपचार

10:59 PM Nov 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कॅन्सरपासून मुक्ती मिळत असल्याचा दावा

Advertisement

जगभरात अनेक धोकादायक आजार समोर येऊ लागले आहेत. यातील काही आजारांवर उपचार काही प्रमाणात वैज्ञानिकांनी शोधून काढले आहेत. तर अनेक आजार आजही उपचाररहित आहेत. तर धोकादायक आजारांवरील उपचार अत्यंत महागडे असतात. अशा स्थितीत गरीब लोक देशी उपचाराद्वारे स्वत:ला बरे करवून घेण्याचा प्रयत्न करतात. वैद्यकीय शास्त्राच्या प्रगतीच्या कालखंडातही अशा प्रकारच्या प्रथा  कित्येक वर्षांपासून चालत आल्या आहेत. एका पारंपरिक पद्धतीद्वारे कर्करोग, वंध्यत्व,  नैराश्य, स्मृतिभ्रंश समवेत अनेक अन्य आजार बरे केले जात असल्याचा दावा करण्यात येतो.

Advertisement

या उपचारपद्धतीला कंबो ट्रीटमेंट म्हटले जाते आणि यात विषाचा वापर केला जातो. कंबो ट्रीटमेंट हा गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांना दिली जाते. सर्वसाधारणपणे अमेझॉन क्षेत्रातील देशांमध्ये याचा वापर केला जातो. कॅन्सरपासून अल्झायमरपर्यंतच्या रुग्णांना या पद्धतीच्या अंतर्गत बेडकाचे विष शरीरात सोडले जाते. याच्यासाठी एक प्रक्रिया आहे. ज्याच्या अंतर्गत प्रारंभी रुग्णाला एक लिटर पाणी किंवा कसावा सूप प्यायला दिले जाते. याच्या काही वेळानंतर तप्त रॉडद्वारे खांदे, हात किंवा गळ्यानजीक डाग दिला जातो, ज्यामुळे फोड निर्माण होते, मग भाजलेल्या ठिकाणी बेडकाचे विष भरले जाते. या विषामुळे संबंधिताची स्थिती वेड्यांप्रमाणे होते. रक्ताद्वारे बेडकाचे विष पूर्ण शरीरात फैलावते, यामुळे रुग्णाला उलटी होऊ लागते, वारंवार मूत्रविसर्जन, चक्कर येणे, उच्च रक्तदाब आणि पोटदुखी सुरू होते.

सर्वसाधारणपणे हा प्रकार 5 मिनिटांपासून 30 मिनिटांसाठी असतो. परंतु अनेक लोकांवर याचा प्रभाव तासांपर्यंत राहतो. यादरम्यान लोकांना नजीकच्या नदीत पहुडण्यास सांगितले जाते, जेणेकरून शरीर थंड राहील, तरीही लोक वेदनेने विव्हळत असतात. अनेकदा तर लोक बेशुद्ध पडतात. काही वेळानंतर शरीरातून विष बाहेर काढण्यासाठी पीडित रुग्णाला पाणी किंवा चहा प्यायला दिला जातो.

कंबो मूळ स्वरुपात विष असल्याने काही देशांमध्ये याच्यावर बंदी घालण्यात आली आहे. परंतु अमेरिकेसारख्या विकसित देशातही याचा वापर सुरू आहे. ही उपचारपद्धत किती उपयुक्त आहे यावर अद्याप संशोधन झालेले नाही. तरीही हजारो लोक आजही या पद्धतीने स्वत:वर उपचार करवून घेत आहेत.

अनेक देशांध्ये कंबो ट्रीटमेंटवर बंदी घालण्यात आलेली नाही. या उपचारपद्धतीमुळे अनेक जण मारले गेले आहेत. 2019 मध्ये नताशा लेचनर नावाच्या महिलेचा कंबो ट्रीटमेंटदरम्यान मृत्यू झाला होता. 2021 मध्ये जॅरेड एंटोनोविकचा मृत्यू देखील या उपचारामुळे झाला. 20108 मध्ये इटलीत एका इसमाचा मृत्यू झाला. तर चिलीत 2009 साली एका इसमाचा उपचारामुळे मृत्यू झाला होता.

Advertisement
Next Article